AI च्या वाढत्या धोक्यांदरम्यान केंब्रिज डिक्शनरीची मोठी घोषणा; Human शब्द ठरला 2026 चा 'वर्ड ऑफ द इयर'

Word of the Year 2026: AI च्या वाढत्या प्रभावादरम्यान केंब्रिज डिक्शनरीची खास निवड; जाणून घ्या का ठरला 'ह्युमन' शब्द महत्त्वाचा?
Cambridge Dictionary Names 'Human' Word of the Year 2026 Amid AI Rise

Cambridge Dictionary Names 'Human' Word of the Year 2026 Amid AI Rise

esakal 

Updated on: 

Cambridge Dictionary’s Word of the Year 2026: सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचे वारे वेगाने वाहत आहेत. तंत्रज्ञानाच्या या वेगवान प्रगतीमुळे मानवी जीवन सोपे होत असले तरी, दुसरीकडे मानवाच्या विचारशक्तीवर आणि अस्तित्वावर त्याचे काय परिणाम होतील, याबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध 'केंब्रिज डिक्शनरी'ने (Cambridge Dictionary) 2026 या वर्षासाठी 'ह्युमन' (Human) या शब्दाची 'वर्ड ऑफ द इयर' (Word of the Year) म्हणून निवड केली आहे.

सामान्यतः शब्दकोशांकडून दरवर्षी एखादा नवीन किंवा प्रचलित स्लँग शब्द निवडला जातो. पण, यंदा केंब्रिज डिक्शनरीने थेट 15 व्या शतकात मागे वळून पाहत 'Human' या शब्दावर शिक्कामोर्तब केले आहे. यंत्र आणि माणूस यांतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Loading content, please wait...