

CAN YOU APPLY VITAMIN E OIL DIRECTLY ON FACE
sakal
त्वचेची काळजी घेण्यासाठी व्हिटॅमिन E चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. बाजारात व्हिटॅमिन E असलेले क्रीम, सीरम आणि ऑइल सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेक जण व्हिटॅमिन E कॅप्सूलमधील तेल थेट चेहऱ्यावर लावतात. मात्र हे प्रत्येकाच्या त्वचेसाठी योग्य असेलच असे नाही.
व्हिटॅमिन E त्वचेसाठी फायदेशीर अँटीऑक्सिडंट आहे. मात्र त्याचा योग्य प्रकारे आणि त्वचेच्या प्रकारानुसार वापर करणे महत्त्वाचे आहे. याबाबत त्वचारोगतज्ज्ञ आणि एस्थेटिक फिजिशियन डॉ. चांदनी जैन गुप्ता यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.