esakal | वेळेपूर्वीच रिटायरमेंट घेणं कितपत योग्य?
sakal

बोलून बातमी शोधा

वेळेपूर्वीच रिटायरमेंट घेणं कितपत योग्य?

वेळेपूर्वीच रिटायरमेंट घेणं कितपत योग्य?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

गेल्या काही वर्षांमध्ये वेळेपूर्वीच सेवानिवृत्ती म्हणजेच रिटायरमेंट घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सध्याच्या काळात वर्किंग प्रोफेशनल्सलादेखील त्यांची विश लिस्ट विचारली तर लवकरात लवकरत व्हीआरएस (VRS) घ्यायचीये हेच ऐकायला मिळतं. परंतु, वेळेपूर्वीच रिटायरमेंट घेणं खरंच योग्य आहे का? किंवा हा निर्णय घेतल्यानंतर पुढे काय करणार हे ठरवलंय का? जर याचं उत्तर नाही असं असेल तर रिटायरमेंट घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा ते जाणून घेऊयात. (career and money do you also want to retire early)

१.स्वत:लाच विचारा रिटायरमेंटनंतर काय करणार?

वयाच्या ४५ व्या वर्षीच रिटायरमेंट घेतल्यानंतर पुढे काय करणार हे ठरवलंय का? अर्थात अनेकांनी पुढचा विचार केलाच नसेल. केवळ नोकरी करायचा कंटाळा आलाय, थकलो अशा काही कारणांमुळे नोकरी सोडणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. मात्र, ४५ व्या वर्षी नोकरी सोडल्यानंतर पुढील संपूर्ण आयुष्य घरी राहून काढणं जमेल का? प्रश्न सुद्धा विचारा. जर उत्तर सापडलं तर नक्कीच रिटायरमेंट घ्या.

२. कुटुंबावर होतो परिणाम-

अनेकदा रिटायरमेंट घेतल्यावर त्याचा कुटुंबावर आणि घरातील सदस्यांवरही परिणाम होऊ शकतो. योग्य नियोजन केलं नसेल तर कुटुंबावर आर्थिक ताण येऊ शकतो. त्यातूनच मग पुढे कौटुंबिक कलह वाढू शकतात. त्यामुळे नीट आर्थिक बजेट पाहूनच रिटायरमेंटचा निर्णय घ्यावा.

३. मानसिकतेवर परिणाम -

वयाच्या ४०-४५ वर्षांपर्यंत माणसाला सतत काम करायची सवय असते. मात्र, अचानकपणे काम बंद झाल्यावर त्याचा मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. घरात राहून नेमकं करायचं काय? हा प्रश्न अनेकांना सतावतो. त्यामुळे जर रिटायरमेंटचं निश्चित केलं असेल तर नंतरच्या फावल्या वेळात मन रमवण्यासाठी काय करता येईल याचाही विचार करुन ठेवा.

loading image
go to top