WFH: घर आणि ऑफिसचं काम करताना तारांबळ उडते? असा राखा कामाचा समतोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Work from home

घर आणि ऑफिसचं काम करताना तारांबळ उडते? असा राखा कामाचा समतोल

कोरोना संकटामुळे सध्याच्या काळात अनेक जण वर्क फ्रॉम होम (work from home) करत आहेत. त्यामुळे आता प्रत्येकालाच घरी बसून ऑफिसचं काम करण्याची सवय लागली आहे. परंतु, अनेकदा घरुन काम करत असताना काही अडचणी येतात. खासकरुन महिला वर्गाला जास्त समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळेच वर्क फ्रॉम होम करताना ऑफिस आणि घर यांचा समतोल कसा राखावा हे आज जाणून घेऊयात. (career-and-money-dos-and-donts-when-working-from-home)

हेही वाचा: 'तुमच्या दुटप्पीपणाचं दुःख वाटतं'; ट्रोलर्सला प्रियाने दिलं उत्तर

वर्क फ्रॉम होम करताना 'या' गोष्टींकडे द्या लक्ष

१. वर्क फ्रॉम होम म्हणजे मौज करायला मिळालेली संधी नाही. तर ती एक जबाबदारी आहे. त्यामुळे ही जबाबदारी नीट पाडण्याकडे लक्ष द्या.

२. ऑफिसचं काम करण्यासाठी घरातील शांत आणि ऑर्गनाईज्ड जागेची निवड करा. ज्यामुळे काम करताना मध्ये व्यत्यय येणार नाही.

३. ऑफिसमध्ये टेबलवर जशा आवश्यक वस्तू असतात. तशाच वस्तू घरी निवडलेल्या जागी असाव्यात.

४. कामाचं शेड्युल तयार करा.

५. घरातील वायफाय किंवा इंटरनेटचा स्पीड चांगला असेल याची काळजी घ्या.

६. ऑफिसची मिटींग सुरु असताना त्यात व्यत्यय येणार नाही. याची काळजी घ्या. तसंच मिटींगसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी नीट अरेंज करा.

७. जर घरात काम करताना काही अडचण येत असेल तर तुमच्या सीनिअर्ससोबत नक्की बोला आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा.

८. घरुन काम करत असल्यामुळे अनेकदा आपण घरातील लहान -सहान काम करतो. मात्र, ऑफिसचं काम सुरु असताना इतर कामांकडे दुर्लक्ष करा. तुम्ही ऑफिसमध्ये बसलात असं समजा आणि त्यानुसार काम करा. जर तुम्ही प्रत्येक मिनिटाला उठून घरचं काम करत असाल तर घरातल्यांच्याही अपेक्षा वाढतील. आणि, तुमच्यावरील कामाला लोड वाढेल.

९. ऑफिसला जाताना ज्या पद्धतीने तयार होतो त्याच पद्धतीने तयार होऊन कामाची सुरुवात करा. त्यामुळे आपोआप काम करण्याची इच्छा वाढेल.

१०. सलग ८ तास बसून काम करण्यापेक्षा मध्ये मध्ये ब्रेक घ्या.

११. बॅकअप प्लॅन कधीही तयार ठेवा.

Web Title: Career And Money Dos And Donts When Working From

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..