आली दिवाळी! ऑनलाइन शॉपिंग करताना 'अशी' घ्या काळजी

आली दिवाळी! ऑनलाइन शॉपिंग करताना 'अशी' घ्या काळजी
आली दिवाळी! ऑनलाइन शॉपिंग करताना 'अशी' घ्या काळजी
आली दिवाळी! ऑनलाइन शॉपिंग करताना 'अशी' घ्या काळजीSakal
Summary

दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीची लगबग सुरू आहे. बहुतांश लोक रोखीने नव्हे तर ऑनलाइनच्या माध्यमातून व्यवहार करीत असल्याचे चित्र आहे.

सोलापूर : दिवाळीनिमित्त (Diwali) बाजारात खरेदीची लगबग सुरू आहे. बहुतांश लोक रोखीने नव्हे तर ऑनलाइनच्या (Online Shopping) माध्यमातून व्यवहार करीत असल्याचे चित्र आहे. या संधीची वाट पाहणारे सायबर गुन्हेगार (Cyber criminals) सावज शोधू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी त्यांना आलेल्या अनोळखी क्रमांकावरील कॉलवर बॅंकेची माहिती देऊ नये. तसेच कोणतीही ऑफर अथवा गिफ्टच्या आमिषाला बळी पडू नये, अन्यथा फसवणूक (Fraud) होईल, असा इशाराही सायबर पोलिसांनी (Cyber Police) दिला आहे.

आली दिवाळी! ऑनलाइन शॉपिंग करताना 'अशी' घ्या काळजी
MPSC : मागणीपत्रासाठी आता डिसेंबरची मुदत! सरसकट वयोमर्यादा वाढ नाहीच

डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आता बहुतेकजण सुरक्षिततेच्या कारणास्तव मोठी रक्‍कम जवळ बाळगत नसल्याची स्थिती आहे. गूगल पे, फोन पे, भीम ऍप यासह डेबिट व क्रेडिट कार्डवरून खरेदीचे व्यवहार करीत आहेत. परंतु, काहीजण सहजपणे लक्षात राहावा म्हणून दुचाकीचा अथवा मोबाइल क्रमांकातील शेवटचे अंक पिन म्हणून ठेवतात. तर काहीजण जन्म तारीख पिन म्हणून निवडतात. सायबर गुन्हेगार त्यानुसार प्रयत्न करून समोरील व्यक्‍तीची फसवूणक करतात, असेही काहीवेळा घडले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या क्रेडिट तथा डेबिट कार्डचा पिन क्रमांक वारंवार बदलावा, असेही आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. तसेच महागड्या वस्तू (सोने-चांदीचे दागिने), मोठी रक्‍कम घरात न ठेवता बॅंकेत तथा बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवावे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, लाखो रुपयांचे घर खरेदी केल्यानंतर सर्वांनी सुरक्षिततेसाठी घरासमोर उत्तम दर्जाचा सीसीटिव्ही देखील बसवून घ्यावा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

ग्राहकांनी 'अशी' घ्यावी खबरदारी...

  • क्रेडिट अथवा डेबिट कार्डचा पिन नंबर, यूजर आयडी व पासवर्ड कोणालाही सांगू नका

  • मोबाईलला आलेला ओटीपी कोणत्याच अनोळखी व्यक्‍तीला देऊ नका

  • अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलवर आपल्या बॅंक खात्याची माहिती सांगू नका

  • सणानिमित्त ऑफर, गिफ्ट, बक्षीस भेटल्याचे मेसेज, कॉल येतात, त्या आमिषाला बळी पडू नये

  • सातत्याने आपला पिन नंबर बदलावा; माहिती नसलेल्या अनावश्‍यक वेबसाईट्‌स सर्च करू नका

  • वस्तू खरेदीनंतर आपल्या क्रेडिट, डेबिट कार्ड असलेल्या बॅंक खात्यातून तेवढीच रक्‍कम कमी झाल्याची खात्री करा

आली दिवाळी! ऑनलाइन शॉपिंग करताना 'अशी' घ्या काळजी
Solapur : आमदार प्रणिती शिंदेंच्या मनात आहे तरी काय?

यंदा शहरातील साधारपणे 50 पेक्षा अधिक व्यक्‍तींची ऑनलाइन फसवणूक झाल्याच्या तक्रारी दाखल आहेत. आमिषाला बळी पडलेल्यांचे प्रमाण त्यात सर्वाधिक आहे. काहींनी बॅंक खात्याची माहिती फोनवरून अनोळखी व्यक्‍तीला दिल्याचेही प्रकार घडले आहेत. दिवाळीनिमित्त नागरिकांनी आमिषाला बळी न पडता, फसवणूक होणार नाही, यादृष्टीने खबरदारी घ्यावी.

- सुनील दोरगे, पोलिस निरीक्षक, सायबर, सोलापूर शहर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com