
How To Improve Relationship With Your Partner Naturally: प्रसिद्ध पोषणतज्ञ आणि लेखक रुजुता दिवेकर, या सतत सोशल मीडियावर आहाराविषयी, फिटनेस बद्दल छोटे छोटे सल्ले आणि माहिती देत असतात. पण त्याचसोबत त्या इतर दैनंदिन विषयांवर, जसेकी महिला सशक्तीकरण, वाढत्या वयातील मुलांचे आरोग्य त्यांच्यातील शारीरिक बदल यबद्दलही साधे आणि सोपे विचार मांडत असतात.
अशाचप्रकारे रुजुता दिवेकरांनी अलीकडेच एका वेगळ्या विषयासाठीचे तीन सोपे आणि उपयोगी सल्ले शेअर केले आहेत, जे त्यांच्या मते कोणत्याही नातेसंबंधात, विशेषतः नवरा-बायको यांच्यात, सुधारणा करू शकतात.
नेहमीप्रमाणेच त्यांची भाषा सोपी आणि थोडीशी मिश्कील होती. त्यांनी अशा काही सामान्य चुका सांगितल्या ज्या अनेकजण नकळत करतात आणि त्या नात्यांवर परिणाम करू शकतात. यासोबतच, त्यांनी असे सल्ले दिले जे समजायला सोपे आहेत आणि खरोखर उपयोगी ठरू शकतात.
हे सल्ले केवळ नवरा-बायकोसाठीच नाहीत, तर कोणतेही नाते अधिक चांगले आणि समजूतदार बनवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. चला तर मग हे सल्ले कोणते ते पाहूयात.
रुजुता म्हणतात, "हे चुकीचे प्रश्न असतात, त्यामुळे याची योग्य उत्तरं असूच शकत नाहीत." स्वतःला कसं वाटतंय हे महत्त्वाचं, दुसऱ्याच्या मतावर अवलंबून राहू नका.
जर कौतुक शक्य नसेल, तर निदान तिच्या प्रयत्नांची दखल घ्या. आणि काहीच नाही जमलं, तरी सल्ला न देता गप्प बसा. हेच फार असतं.
नातं म्हणजे परिपूर्ण व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न नाही. त्याऐवजी एकमेकांच्या त्रुटी स्वीकारा, त्यात सौंदर्य पहा. रुजुता म्हणतात, “हीऱ्याची ओळख पारख्यालाच असते.”
रोजच्या जीवनात वापरता येतील असे हे सल्ले साधे असले तरी मोठा आणि सकारात्मक बदल घडवतात. जसं रुजुता साध्या आणि उपयोगी पद्धतीने आहाराबद्दल सांगते, तसंच तिने नातेसंबंधांवर दिलेला सल्लाही खरंच मनाला पटणारा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.