सेलिब्रिटी वीकएण्ड : स्वयंपाक अन् फिरण्याचा ‘रिचार्ज’ मंत्र

अंशुमन विचारे, अभिनेता
Friday, 2 October 2020

मी नेहमीच कुटुंबाला अधिक वेळ देतो. चित्रीकरणातून लवकरच किंवा रात्री परतलो, की मुलीला आणि पत्नीला गाडीतून फिरवून आणतोच. माझी मुलगी आता तीन वर्षांची होईल. त्यामुळे शनिवार, रविवार तिच्यासाठीच असतो. शनिवारी कधी वेळ मिळाला, की मी कुटुंबीयांसोबत बाहेर जेवायला जातो.

मी नेहमीच कुटुंबाला अधिक वेळ देतो. चित्रीकरणातून लवकरच किंवा रात्री परतलो, की मुलीला आणि पत्नीला गाडीतून फिरवून आणतोच. माझी मुलगी आता तीन वर्षांची होईल. त्यामुळे शनिवार, रविवार तिच्यासाठीच असतो. शनिवारी कधी वेळ मिळाला, की मी कुटुंबीयांसोबत बाहेर जेवायला जातो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खरं तर माझी पत्नी उत्तम स्वयंपाक बनवतो. तिच्या हातचं जेवण मला खूप आवडतं, त्यामुळे बाहेर जेवायला जाणं पसंत करत नाही; पण तरीही तिला सुट्टी मिळावी म्हणून हॉटेलात जेवायला जातो.

रविवारी आमच्याकडे उशिरा उठण्याचा प्रघात आहे आणि उठल्यानंतर चहा आणि नाश्ता मी स्वतः बनवतो. माझ्या हातचा नाश्ता पत्नीला खूप आवडतो. मात्र, दुपारचे जेवण वगैरे ती बनवते. रविवारी आमच्याकडे मांसाहार केला जातो. त्याशिवाय एकही रविवार जात नाही. संध्याकाळी पत्नी आणि मुलीला घेऊन बाहेर कुठंही फिरायला जातो. आत्ताच मी पत्नी आणि मुलीला घेऊन मालगुंड (रत्नागिरी) इथं गेलो होतो. त्यांना थोडा चेंज मिळावा म्हणून गेलो होतो.

बाकी शनिवारी किंवा रविवारी चित्रपट वगैरे पाहायला जात नाही. घरीच चित्रपट व वेब सीरिज पाहिल्या जातात. अलीकडे चित्रीकरणामुळे वाचन होत नाही. मात्र, दैनंदिन वर्तमानपत्रे वाचतो. माझी मित्रमंडळी खूप आहेत, परंतु त्यांना हल्ली भेटण्याचा योग कमी येतो. कधी आमची भेट झाली तर मग काय...धमालच धमाल. गाण्यांवर चर्चा, चित्रपटांवर चर्चा अशा विषयांवर चर्चा रंगते. परंतु आता मी अधिक कुटुंबवत्सल झालो आहे. त्यामुळे मित्रमंडळींना फारसे भेटता येत नाही. सेटवर काम करताना भेटणं होतं तेवढंच. आता मी जो ‘सिगिंग स्टार’मध्ये सहभागी झालो आहे ते माझा छंद जोपासण्यासाठीच. गाण्याचा मला खूप छंद आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrity weekend article anshuman vichare