chanakya NIti: चुकूनही ‘या’ गोष्टींना पाय लावू नका, नाहीतर करावा लागेल आयुष्यभर पश्चाताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chanakya NIti:

chanakya NIti: चुकूनही ‘या’ गोष्टींना पाय लावू नका, नाहीतर करावा लागेल आयुष्यभर पश्चाताप

चाणक्य हे सर्वज्ञानी होते. त्यांच्या नीती आजही अनेक लोक आत्मसात करतात. चाणक्यांच्या नीती माणसाला खुप सुसज्ज जगण्यास मदत करतात. चाणक्य नीतित माणसांच्या हिताच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहे. आज आम्ही तुम्हाला काही गोष्टींना पाय लागला तर चाणक्य नीतीनुसार याचा विपरीत परीणाम कसा होतो, या विषयी तुम्हाला सांगणार आहोत.चला तर जाणून घेऊया.

चाणक्य नितीनुसार या खालील गोष्टींना कधीही पाय लावू नका.

हेही वाचा: Chanakya Niti: आयुष्यात सदैव निरोगी राहण्यासाठी 'या' गोष्टींचे पालन करा

अग्नी - अग्नीला चुकूनही पाय लावू नका, हे तुमच्या जीवनासाठी अशुभ मानलं जातं.

गुरू - गुरू हे सर्वोच्च स्थानी असतात. गुरूंना कधीही चुकूनही पाय लावू नका. नाहीतर तुमच्या विकासात अनेक अडचणी येऊ शकतात.

हेही वाचा: Chanakya Niti: आयुष्यात सदैव निरोगी राहण्यासाठी 'या' गोष्टींचे पालन करा

गाय - हिंदू धर्मात गायीला विशेष महत्त्व आहे. गायीला चुकूनही पाय लावू नका किंवा तिला मारू नका. असे केल्यास तुम्ही सर्वात मोठ्या पापात सहभागी होतात.

मुलगी - मुलगी किंवा कन्या या देवीच्या रुप असतात. यांना कधीही दुखवू नका. त्यांना चुकूनही पाय लावू नका. त्यांचा अपमान हा देवीचा अपमान असतो.