
मायग्रेनपासून सुटका हवीये? लाइफस्टाईलमध्ये करा हे बदल
मायग्रेन हा नेहमीच्या आजारांपैकी एक. मायग्रेन चा त्रास होण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. सहसा लाईट किंवा आवाजामुळे डोकेदुखीचा त्रास सुरु होतो. प्रत्येकासाठी डोकेदुखीची तीव्रता वेगवेगळी असतेय काही लोकांना पुर्ण डोक्यात किंवा एक ठराविक जागेवर दुखणे जाणवते. अनहेल्थी लाईफस्टाईलमुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याचे दिसते. तुम्हाला या आजारापासून सुटका हवी असल्यास लाईफस्टाईलमध्ये काही बदल करुन बघा,तुम्हाला लवकरच फरक जाणवेल.

पुरेशी झोप घ्या
तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर मायग्रेनच नाही तर इतर आजारदेखील होऊ शकतात, त्यामुळे सतत होणाऱ्या मायग्रेनच्या त्रासापासून वाचण्यासाठी आणि प्रभावी पद्धतीने हा आजार संपविण्यासाठी दिवसभरात 7-8 तास झोप गरजेची आहे. पुरेशी झोप घेतल्यामुळे पेशी निरोगी राहण्यासाठी आणि पुन्हा अक्टिव्ह होण्यासाठी वेळ मिळतो. पुरेशी झोपेमुळे इतर आजार देखील दुर राहातात.

Sleep
जेवण सोडू नका
तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा नसले तरी कधीही जेवण करणे सोडू नका. नेहमी वेळच्या वेळी शरीराला पौष्टीक आहार मिळाला पाहिजे. जर तुम्ही वेळेवर जेवण करत न्सा तर शरीराचे सर्वात जास्त नुकासान होतेय त्यामुळे वेळे जेवन करा ज्यामुळे तुम्ही निरोगी राहाल आणि इतर आजारांपासून देखील दूर राहाल.

Food
तनावापासून दुर राहा
कोणत्याही गोष्टीचा अतिविचार केल्यामुळे तनाव वाढू शकतो. तनावामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होत असून डिप्रेशन देखील येऊ शकते. विनाकारण चिंतेपासून स्वत:ला दूर ठेवा आणि शक्य तितके आनंदी राहा. आनंदी राहून आपण इतर लोकांना आनंदी ठेवू शकता.

No Stress
गरजेपेक्षा जास्त फोनचा वापर टाळा
गरजेपेक्षा जास्त फोन, लॅपटॉप, टॅबचा वापल्यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो ज्यामुळे डोके दुखी वाढते. मायग्रेन चा दुखण्यापासून वाचण्यासाठी या वस्तूंचा वापर कमी करा.

No Mobile, laptop , Phone
तंबाकू आणि दारूचे सेवन न करें
स्मोकिंगमुळे आणि दारुनचे अतिसेवनामुळे शरीरातील अशक्तपणा वाढतो. तसेच आपले मानिसक आणि शारीरिक आरोग्ये देखील खराब होते.

No alcohol
नियमित व्यायाम करा
आपले आरोग्याच्या स्थितीनुसार डॉक्टर आणि फिटनेस ट्रेनर च्या सल्ल्यानुसार व्यायाम करा. आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योगासन, प्राणायाम, आणि व्यायाम करावा. त्यामुळे तुम्ही निरोगी आणि स्वस्थ राहाल.

yoga