

From Trust Issues to Emotional Distance: 6 Relationship Queries People Asked ChatGPT
sakal
निरोगी संवाद म्हणजे नेमका काय, इथपासून ते आपलं रिलेशनशिप भावनिकदृष्ट्या सुरक्षित आहे का, अशा अनेक शंका लोकांच्या मनात येत असतात. मात्र या प्रायव्हेट शंका अनेकदा कोणाशीही बोलण्यापूर्वी इंटरनेटवर शोधल्या जातात.
रिलेशनशिप जेवढं सुख आणि आनंद देतात, तेवढमच ते संभ्रम, भावनिक संघर्ष आणि असुरक्षितता यासाठी कारणीभूत ठरतात. जेव्हा मनात गोंधळ निर्माण होतो, तेव्हा अनेकजण आता स्पष्टतेसाठी डायरेक्ट AIची मदत घेत आहेत. अलीकडी असं पाहायला मिळतंय की, लोक फक्त प्रेमाबद्दलच नाही, तर रिलेशनशिपमधल्या मर्यादा (boundaries), भावनिक दुरावा (emotional distance), विश्वास (trust) आणि स्वतःच्या मानसिक आरोग्याबद्दलही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.