लहान मुलांना सारख्या उचक्या का येतात? जाणून घ्या कारण आणि उपाय

बालरोगतज्ज्ञांच्या मते लहान मुलांना उचक्या येणे सामान्य बाब आहे.
Child hiccups
Child hiccups Sakal
Updated on

लहान मुलांना खूप उचक्या येतात. ते दर काही मिनिटांनी उचक्या देतात. असे होणे अगदी सामान्य बाब आहे. असे मानले जाते की गर्भधारणेच्या दुस-या तिमाहीपासून बाळाला आईच्या पोटात उचक्या येण्यास सुरुवात होते.

असे म्हटले जाते की लहान मुलांमध्ये उचक्यामुळे त्यांची भूक वाढते, पण हे कारण स्पष्ट नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, नवजात किंवा मुलांना त्यांच्या दिनचर्येमुळे किंवा खाण्याच्या सवयींमुळे उचक्या येऊ शकतात. लहान मुलांना उचक्या का येतात आणि ते थांबवण्यासाठी काय करायला हवे हे जाणून घेऊया.

मुलांना उचक्या येणे किती सामान्य आहे ?

तज्ज्ञांच्या मते मुलांना उचक्या आल्यास काळजी करू नका, हे अगदी सामान्य आहे. मुलांना त्यांच्या भुकेची जाणीव होत नाही त्यामुळे ते त्यांच्या भुकेपेक्षा जास्त दूध पितात आणि त्यामुळे अनेक वेळा दूध अन्नाच्या नळीतून बाहेर पडून विंड नळीत जाते. विंड पाईपमधून ते काढण्यासाठी मुले उचक्या देतात.

मुलांना दूध पाजल्यानंतर त्यांना लगेच झापवू नका. वास्तविक, जेव्हा मुले मोठी होतात तेव्हा उचक्यांची समस्या कमी होऊ लागते. उचकी ही मेंदूला डायाफ्रामशी जोडणाऱ्या मज्जातंतूपासून उद्भवते. हे अनेक गोष्टींनी बंदही होऊ शकते.

Child hiccups
Child Care Tips: लहान मुलांमध्ये दिसणाऱ्या 'या' समस्यांकडे करू नका दुर्लक्ष, असू शकतात मधुमेहाची लक्षणे

लहान मुलांना उचक्या का येतात?

तज्ज्ञांच्या मते मुलांना उचक्या येण्याचे कोणतेही एक कारण नाही. लहान मुलांना एकाच वेळी जास्त प्रमाणात खायला दिल्याने त्यांचे पोट फुगते, त्यामुळे डायाफ्राम विस्तारू लागतो किंवा आकुंचन पावतो आणि त्यांना उचक्या येऊ लागतात. अनेक मुले खूप लवकर दुध पितात, त्यामुळे त्यांच्या अन्ननलिकेत दूध अडकते आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. यामुळे उचकी देखील येऊ शकते. मुलांमध्ये, प्रथिने देखील अन्न पाईपमध्ये सूज आणू शकतात, ज्यामुळे डायाफ्रामची समस्या उद्भवते आणि उचकी येऊ शकते.

मुलांच्या उचक्या कशा थांबवाव्या?

तज्ज्ञांच्या मते, प्रौढांप्रमाणेच लहान मुलांमध्येही काही वेळाने उचकी येणे स्वतःहून थांबते. यामुळे जेव्हा जेव्हा उचकी येते तेव्हा थोडा वेळ थांबा. त्यांना थोडे थोडे खायला द्या. उचकी आल्यास त्याला थोडावेळ आधार देऊन बसवा. यामुळे मुलांना खूप आराम मिळेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com