Chocolate Day : तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी घरच्या घरी बनवा Chocolate Bouquet l Chocolate Day Chocolate Bouquet making | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chocolate Day

Chocolate Day : तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी घरच्या घरी बनवा Chocolate Bouquet

Chocolate Bouquet Making : चॉकलेट डे ला प्रिय व्यक्तीला चॉकलेट दिलं जातं. पण रेडिमेड चॉकलेट घेऊन देण्यापेक्षा स्वतःच्या हाताने बनवून देण्याची मजा आणि गोडी काही औरच असते. असं म्हणतात प्रेमाच्या माणच्या प्रेमाची गोडी त्यात उतरते. घरच्या घरी चॉकलेट बनवून त्याचा स्वतःच बुके बनवून प्रिय व्यक्तीला तुम्ही देऊ शकतात. त्यासाठी जाणून घ्या प्रक्रिया.

घरी चॉकलेट कसे बनवावे?

साहित्य

डार्क चॉकलेट केक

व्हाईट चॉकलेट केक

चॉकलेट शेप ट्रे

कृती -

पहिले एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते गरम करून घ्यावे. त्यात एक तुलनेने लहान भांड ठेवून त्यात पहिले थोडे डार्क चॉकलेट घेऊन चमच्याने हलवत राहून वितळवून घ्या. डार्क चॉकलेट पूर्ण वितळले की, त्यात थोडे थोडे व्हाईट चॉकलेट घाला. चॉकलेट किती डार्क किंवा माइल्ड करायचे याचा अंदाज घेत व्हाइट चॉकलेटचं प्रमाण वाढवा.

संपूर्ण मिश्रण वितळल्यावर गॅसवरून उतरवून घ्या आणि ते पातळ असताना विविध आकाराच्या चॉकलेट मोल्डमध्ये टाका. थोडं हलवून त्यातील बबल्स काढून टाका. मग ते मोल्ड्स फ्रिजरमध्ये २-४ तासांसाठी ठेवा.

चॉकलेट छान सेट झाल्यावर चमकीच्या रॅपर्समध्ये छान रॅप करा.

बुके कसा बनवावा?

  • सगळ्यात पहिले रॅप केलेल्या चॉकलेट्सला लावण्यासाठी लांब पण बारीक बांबूच्या काड्या घ्या. त्या चॉकलेटच्या मागच्या बाजूने फुलाच्या दांडीप्रमाणे चिकटवा.

  • मग बुके नेमका कसा बनवायचा आहे, बास्केट की, हँडी त्यानुसार त्याची रचना ठरवता येते.

  • त्यासाठी जर बास्केट बुके बनवायचा असेल तर एक बास्केट घेऊन त्यात आता चौकोनी जाड स्पंज ठेवा.

  • बास्केटला हँडल असेल तर सॅटीन रिबीन गुंडाळून सगळ्यात आधी हँडल आणि बास्केटचा बाहेरचा भाग सजवा.

  • त्यानंतर स्पंज झाकण्यासाठी त्यावरून गिफ्ट पेपर लावा.

  • चॉकलेटच्या काड्यांसह लहान मोठ्या उंचीने चॉकलेट स्पंजवर खोचून अरेंज करा.

  • बास्केटमध्ये रंगीत थरमाकोल बॉल्स टाका. आणि त्यावर वरून चमकी भूरकवा.

  • त्यात ड्राय फ्लावर किंवा पानांना रंगवून ते खोचावे.

हँडी बुकेसाठी

  • चॉकलेट काड्या स्पंजवर खोचून घ्याव्या. त्यासोबत छोटे कापडी फुलं किंवा डेकोरेशनसाठी आवश्यक ड्राय फ्लावर्स खोचावे.

  • डार्क किंवा काँस्ट्रास्ट रंगाच्या शायनिंग पेपरचा कोन नवावा. तो नीट स्पंज भोवती लावावा.

  • हे सर्व रबरबँड लावून फिक्स करावं.

  • त्यावरून सॅटीन रिबन गुंडाळून रबर बँड झाका.

  • त्यासोबत एक छानसा छोटासा टेडी, गिफ्ट काहीही देऊ शकतात.

टॅग्स :chocolate