निवड ड्रायव्हिंग स्कूलची

ड्रायव्हिंग करता येते का, असा प्रश्न कोणी विचारल्यावर आपले उत्तर थेट ‘नाही’ असेल; तर कुठेतरी चुकचुकल्यासारखे वाटते
choice driving school Driving Licence traffic rule police
choice driving school Driving Licence traffic rule police sakal
Summary

ड्रायव्हिंग करता येते का, असा प्रश्न कोणी विचारल्यावर आपले उत्तर थेट ‘नाही’ असेल; तर कुठेतरी चुकचुकल्यासारखे वाटते

ड्रायव्हिंग करता येते का, असा प्रश्न कोणी विचारल्यावर आपले उत्तर थेट ‘नाही’ असेल; तर कुठेतरी चुकचुकल्यासारखे वाटते. हल्ली धावपळीच्या युगात प्रत्येकाला किमान ड्रायव्हिंग येणे आवश्यकच आहे.

आपल्या आसपास अनेक ड्रायव्हिंग स्कूलही असतात; परंतु तेथे योग्य प्रशिक्षण मिळते का, हा प्रश्न असतो. म्हणूनच ‘ड्रायव्हिंग स्कूल’ निवडताना कोणती खबरदारी घ्यावी, तेथून नेमके काय शिकावे याबद्दल सविस्तर...

प्रशिक्षण संस्थेचा दर्जा : ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी त्या ठिकाणी आधी प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींकडून संस्थेची चौकशी करा. तेथे कसे प्रशिक्षण मिळते याबाबत माहिती घ्यावी. किंवा आपल्या परिसरात सर्वोत्तम ड्रायव्हिंग क्लास कोणते, याबाबत ऑनलाईन पडताळणी करता येऊ शकते. याबाबत मित्र, नातेवाईकही मदत करू शकतात.

परवानाकृत आणि प्रमाणित संस्था : अनधिकृत ड्रायव्हिंग स्कूलचा सुळसुळाट वाढला आहे. या संस्थांमध्ये त्रुटी आढळतात किंवा सुरक्षा नियमांचे पालन केले जात नसते. त्यामुळे ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देत असलेली संस्था परवानाकृत तसेच सरकारच्या संबंधित विभागाकडे नोंदणीकृत आहे की नाही, हे तपासावे.

प्रशिक्षणाची रचना : ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणाची रचना किंवा स्वरूप काय आहे, याची खात्री करा. प्रशिक्षणात ड्रायव्हिंगच्या ‘ऑन ग्राऊंड’ तथा प्रॅक्टिकलसह पुस्तकी तथा थेअरॉटिक शिक्षणही मिळणार आहे का, हे तपासा. आपल्या आसपास काही मंडळी असतात, जी केवळ वाहन चालवण्याचा परवाना (लायसन्स) मिळते म्हणून ड्रायव्हिंग स्कूल लावतात; परंतु यात रस्ता सुरक्षा नियमांना तिलांजली मिळू शकते.

अनुभवी प्रशिक्षक : ड्रायव्हिंग स्कूलमध्ये अनुभवी आणि परवानाधारक प्रशिक्षक आहेत का, याची खात्री करा जे तुम्हाला सुरक्षित आणि प्रभावी पद्धतीने प्रशिक्षण देऊ शकतात. अनुभवी यासाठीच, की जो कोणत्या प्रसंगी वाहन कसे हाताळावे याचे बारकावे चालकाला समजावून सांगतो किंवा त्याचे प्रत्यक्षिकही देतो.

शुल्क आणि वेळ : आपले बजेट आणि वेळेचे गणित जुळवून ड्रायव्हिंग क्लासची निवड करा. काही ठिकाणी वाढीव शुल्क आकारले जाते. त्यासाठी इतर ड्रायव्हिंग स्कूलचीही चौकशी करा. काही ड्रायव्हिंग स्कूल शिकाऊ चालकांची गैरसोय टाळण्यासाठी वेळेचे बंधन ठेवत नाहीत. अशा ड्रायव्हिंग स्कूलला प्रशिक्षणासाठी प्राधान्य द्या. त्यामुळे कोणत्याही वेळेत ड्रायव्हिंग शिकता येईल.

ड्रायव्हिंग स्कूलमध्ये काय शिकाल?

  • ड्रायव्हिंग स्कूलमध्ये वाहन चालवताना कोणते नियम पाळावे, रस्त्यावरील विविध चिन्हे, सिग्नल आणि खुणांचे अर्थ.

  • स्टेअरिंग, एक्सलेरेशन, ब्रेक आदींचे तंत्र आणि गीअर्स शिफ्टिंग, वाहन पार्किंग, वळण, वाहतूक कोंडीत वाहन कसे चालवावे.

  • रस्त्यावरील संभ्याव्य धोके, अपघात कसे टाळायचे हे प्रशिक्षित ड्रायव्हर शिकवतो. रस्त्याचे निरीक्षण, वेगाची गरज, सुरक्षित अंतर.

  • ड्रायव्हिंग करताना इतर ड्रायव्हर्स, पादचारी आणि सायकलस्वार यांच्याशी विनम्र कसे रहायचे, आणीबाणीच्या वेळी इतरांना मदत.

  • ड्रायव्हिंग स्कूलमध्ये वाहनांची प्राथमिक दुरुस्ती कशी करायची, ऑईल चेक करणे, टायरातील हवा किती असावी आदी बाबी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com