
Cleaning Tips : पाण्याची बाटली घाण झालीय; मग वापरा हा ऊपाय
घरगुती उपाय : घराबाहेर पडताना आपण बाटलीत पाणी घेऊन जातो. पण तुमच्या लक्षात आले असेल की तुम्ही ज्या बाटल्यांमध्ये पाणी घेवून जाता त्या अनेकदा घाण होऊन पिवळ्या पडतात. बाटली आतून साफ करणे हे सोपे नाही. पण काही टिप्स फॉलो करून तुम्ही गलिच्छ पाण्याच्या बाटल्या सहज स्वच्छ करू शकता.
साबण आणि गरम पाणी
जर तुम्हाला पाण्याची बाटली रोज स्वच्छ करायची असेल तर यासाठी तुम्ही कोमट पाणी आणि साबणाची मदत घेऊ शकता. यासाठी गरम पाण्याने पाण्याची बाटली भरून त्यात साबण टाकून १० मिनिटे तसेच ठेवा नंतर स्वच्छ पाण्याने ती नीट धुवा.
व्हिनेगर आणि गरम पाणी
पाण्याची बाटली स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर देखील वापरू शकता. यासाठी बाटलीमध्ये थोडेसे व्हिनेगर टाका आणि त्यात गरम पाणी टाकून बाटली रात्रभर तशीच राहू द्या. सकाळी बाटली स्वच्छ पाण्याने धुवा.
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा वापरूनही पाण्याची बाटली साफ करता येते. यासाठी बाटलीमध्ये दोन चमचे बेकिंग सोडा टाका आणि कोमट पाण्याने ती भरा. नंतर झाकण उघडून काही तास तसंच ठेवा. नंतर ती स्वच्छ पाण्याने धुवा.
व्हिनेगर वापरा
पाण्याच्या बाटलीला दुर्गंधी येत असेल तर ती स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर वापरा. यासाठी 2 चमचे व्हिनेगर आणि 1 चमचे बेकिंग सोडा घालून बाटलीत टाका आणि थोड्या वेळाने बाटली स्वच्छ करा.