- पूर्णिमा डे, निनाद मिश्रा आणि चिन्मय बिडकर
पूर्णिमा डे ही अभिनेत्री, डॉक्टर आणि डाएटिशियनही. अभिनयाच्या प्रवासात पूर्णिमाच्या आयुष्यात ज्या नात्यांनी मोलाचा ठसा उमटवला, त्यात निनाद मिश्रा आणि चिन्मय बिडकर यांचं नातं मोलाचं आहे.
पूर्णिमा सांगते, ‘‘खरंतर माझं हे एक त्रिकूट आहे. मी, निनाद मिश्रा आणि चिन्मय बिडकर. फक्त मित्र म्हणणं फारच वरवरचं वाटतं. हे दोघं म्हणजे माझं कुटुंबच आहेत. सध्या चिन्मय मलेशियात असतो, निनाद पुण्यात; पण आमचं नातं कुठल्याही शहराच्या मर्यादांपलीकडचं आहे.