

Gastric Ulcer: खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल, अपुरी झोप, तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन, खराब पचन यामुळे शारीरिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. पण अलीकडे पचनाच्या समस्या वाढू लागल्या आहेत. पचनसंस्था बिघडल्यानंतर पोटदुखी, गॅस, बद्धकोष्ठता, ॲसिडिटी अशा अनेक समस्या उद्भवू लागतात. अनेकजण या छोट्या-छोट्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. पण भविष्यात या छोट्या समस्या मोठ्या समस्या बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याकडे योग्य लक्ष देणे गरजेचे आहे.