
छत्रपती संभाजीनगर : आजकाल कमी वयातच मधुमेह, रक्तदाब आणि वजनाच्या समस्या वाढत आहेत. त्याचा कालांतराने मूत्रपिंडावर परिणाम होत आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे होणाऱ्या परिणामांबरोबरच मुतखडा व मूत्रपिंडामध्ये जंतूसंसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.