कोरोनामुळे वाढला रुग्णांमध्ये ब्रेन स्ट्रोकचा धोका! 'अशी' घ्या काळजी | Lyfestyle | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे वाढला रुग्णांमध्ये ब्रेन स्ट्रोकचा धोका! 'अशी' घ्या काळजी
कोरोनामुळे वाढला रुग्णांमध्ये ब्रेन स्ट्रोकचा धोका! 'अशी' घ्या काळजी

कोरोनामुळे वाढला रुग्णांमध्ये ब्रेन स्ट्रोकचा धोका! 'अशी' घ्या काळजी

कोरोना (Covid-19) संसर्गानंतर बरे झालेल्या लोकांमध्ये न्यूरोलॉजिकल (Neurological) समस्या दिसून येत आहेत. त्याच वेळी, ज्या रुग्णांना आधीच न्यूरोचा त्रास आहे त्यांची लक्षणे वाढली आहेत. कोरोनामधून बरे झालेल्या काही रुग्णांमध्ये ब्रेन फॉगिंगची समस्या दिसून येत असल्याचे डॉक्‍टरांचे (Doctor) म्हणणे आहे. जर तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टी विसरत असाल किंवा तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात ठेवणे कठीण जात असेल तर ते ब्रेन फॉगिंगचे लक्षण मानले जाऊ शकते.

हेही वाचा: ब्रॅंडेड कंपन्यांचे महागडे 55 इंची Smart TV आता तुमच्या बजेटमध्ये!

कोरोनाशी लढाई जिंकल्यानंतर आता ब्रेन फॉगिंगमुळे लोकांची अडचण होत आहे. याशिवाय ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांचा बरा होण्याचे प्रमाणही निम्म्याने कमी झाले आहे. डॉक्‍टरांच्या मते, ब्रेन फॉगिंगचे अनेक प्रकार आहेत, ज्यामध्ये जर एखाद्या रुग्णाला स्मरणशक्तीशी संबंधित समस्या येत असेल तर कोणाला बोलण्यात अडचण येते. किंवा एखाद्याला एकाच ठिकाणी लक्ष ठेवता येत नाही. एखाद्या रुग्णाला झोप येत नाही. एखाद्याची काम करण्याची क्षमता कमी झाली आहे.

स्ट्रोक झाला अधिक घातक

कोविडमुळे केवळ रुग्णांनाच ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो असे नाही, तर अशा रुग्णांमध्ये स्ट्रोकपासून बरे होण्याचे प्रमाणही कमी असल्याचे आढळून आले आहे. AIIMS च्या आकडेवारीनुसार, ज्या रुग्णांना कोविड संसर्ग झाला होता आणि त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता त्यांचा रिकव्हरी रेट केवळ 34 टक्के होता, तर ज्यांना कोविड नाही आणि ज्यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता, त्यांचा रिकव्हरी रेट 65 टक्‍क्‍यांपर्यंत होता.

रिकव्हरी दर झाला कमी

एम्सचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. रोहित भाटिया म्हणाले की, जेव्हा आम्ही देशातील 18 शहरांमधील वेगवेगळ्या रुग्णालयांचा डेटा पाहिला, तेव्हा असे आढळून आले की कोविडमुळे ब्रेन स्ट्रोकचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण खूप कमी होते.

हेही वाचा: UP सरकारची विद्यार्थ्यांना मोठी भेट! करणार स्मार्टफोन, टॅबलेटचे वाटप

अशी घ्या काळजी

एम्सच्या न्यूरो विभागाच्या प्रमुख डॉ. पद्मा यांच्या सल्ल्यानुसार, मेंदूला तणावापासून दूर ठेवा. तुमच्या मनात एक नवीन प्रक्रिया तयार करा आणि जे घडले ते विसरून जा आणि पुढे जा. शरीराला पूर्ण झोप द्या आणि स्वत:ला सामाजिक कार्यात सक्रिय ठेवा म्हणजे तुमच्या मेंदूची क्रियाही वाढेल. ज्या लोकांना ब्रेन स्ट्रोक झाला आहे, त्यांच्यासाठी त्यांच्या न्यूरो डॉक्‍टरांकडून औषधे सुरळीत चालू ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. प्रदूषणापासून दूर राहा. धूम्रपान करू नका.

loading image
go to top