esakal | कोरोना कालावधीत मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी: 'या' 7 टिप्सचा होईल फायदा
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना कालावधीत मुलांच्या डोळ्यांची अशी 'घ्या' काळजी

कोरोनाच्या काळामध्ये लहान मुलांचा अधिकतम वेळ हा स्क्रीनवर जात आहे. अशा वेळी नाजूक असलेल्या डोळ्यांच्या बाबत काळजी घेणे आवश्यक आहे.

कोरोना कालावधीत मुलांच्या डोळ्यांची अशी 'घ्या' काळजी

sakal_logo
By
अर्चना बनगे

कोल्हापूर: कोरोना संसर्ग(Covid 19) काळात लहान(Kids) मुलांच्या जीवनशैलीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यांचा बहुतांश वेळ हा खेळण्याऐवजी घरातील मोबाईल आणि लॅपटॉप वर जात आहे. एवढेच नव्हे तर शाळेचा अभ्यास सुद्धा आता मोबाईल आणि लॅपटॉप वरच सुरू आहे. त्यामुळे या लहान मुलांच्या डोळ्याची काळजी (Eye Care)घेणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा आपल्याला भीती वाटते की यामुळे डोळ्यावर काही परिणाम तर होणार नाही का? तज्ञांचे मत आहे की, तुम्ही तुमच्या लहान मुलांचे डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी काही खास गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे. दृष्टी क्षीण होण्यापासून संरक्षण करू शकता. चला तर जाणून घेऊया डोळ्यांची काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची.(corona-kids-eye-care-protection-7-tips-marathi-news)

प्रत्येक वर्षी करा डोळ्यांचे चेकअप

हे आवश्यक नाही की, जेव्हा डोळ्याला त्रास होईल तेव्हाच डॉक्टरला दाखवावे. डॉक्टरांनी अशी शिफारस करतात की, मुलांचे डोळे दरवर्षी तपासले पाहिजेत. जर तुम्ही दरवर्षी आपल्या मुलाचे डोळे तपासत असाल तर, त्यांची दृष्टी बराच काळापर्यत ठीकेल.

खुल्या वातावरणात घेऊन जावा

कोरोना संसर्गाच्या काळात जर तुम्ही मुलांना आऊटडोअर गेमसाठी बाहेर पाठवत नसाल तर आठवड्यातून किमान दोन ते तीन दिवस त्यांना बाहेर फिरण्यासाठी घेऊन जावा. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कारमध्ये बसून शहराच्या बाहेर घेऊन जाऊ शकता. आणि त्या ठिकाणी त्याला खेळण्यासाठी मुभा द्या. असे केल्याने, केवळ त्यांचे डोळे बराच काळ चांगले राहतील परंतु त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकासही चांगला होईल.

पौष्टिक आणि रंगीबिरंगी फळे व भाजीपाला आवश्यक

जर तुम्ही मुलांच्या आहारावर लक्ष केंद्रित करून त्यांना पौष्टिक आहार दिला तर त्याचे शरीर तंदुरुस्त राहण्याबरोबरच डोळेही ही चांगले राहतील. यासाठी दूध, मासे, अंडी, चिकन, ड्रायफ्रुट्स, फळे, भाजीपाला यांचा त्यांच्या आहारामध्ये समावेश करा. प्रत्येक रंगाचे फळ आणि भाजीपाला मुलांना खाण्यासाठी द्या.

स्क्रीन टाइम कमी करा

जर मुलांच्या डोळ्यामध्ये आधिच दोष असेल तर अशावेळी जास्त वेळ इलेक्ट्रॉनिक स्क्रीनवर काम करणे हानिकारक ठरू शकते. यासाठी ज्या ज्या वेळी मुले स्क्रीनवर काम करत असतात त्यावेळी त्यांना मध्ये मध्ये ब्रेक द्या.

चष्मा असेल तर नियमित वापरा

जर तुमच्या मुलाला आधिपासूनच चष्मा लागला असेल तर त्याला तो नियमितपणे वापरणे आवश्यक आहे. अशामुळे स्क्रीनवर पाहत असताना त्यांच्या डोळ्यावर विशेष असा तणाव येणार नाही. आणि डोळ्यांचे नुकसान होणार नाही.

ड्रॉप्सचा वापर योग्य पद्धतीने करा

डोळ्यांमध्ये वेदना आणि थकावट जाणवत असेल तर अनेक वेळा आई वडील मुलांच्या डोळ्यांमध्ये ड्रॉप घालतात. या पद्धतीचा वापर करू नका. नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डोळ्यांसाठी ही व्यायाम करा

डोळ्यांचा व्यायाम नियमितपणे करणे अत्यंत आवश्यक आहे. लहान मुलांच्या दैनंदिन कृतीमध्ये डोळ्याचे व्यायाम बंधन कारक ठेवा. यासाठी त्यांना प्रेरणा द्या. यामुळे डोळे नेहमी तंदुरुस्त राहतील.

डिस्क्लेमर : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

loading image
go to top