esakal | लस घेतल्यावर हेवी ड्रिंक करताय? वेळीच थांबा, नाहीतर...

बोलून बातमी शोधा

लस घेतल्यावर हेवी ड्रिंक करताय? वेळीच थांबा, नाहीतर...
लस घेतल्यावर हेवी ड्रिंक करताय? वेळीच थांबा, नाहीतर...
sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोना (corona) विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात येत आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील तरुणांचं लसीकरणही सुरु झालं आहे. परंतु, लस घेण्यापूर्वी किंवा लसीकरण (corona vaccine) झाल्यानंतर नेमकी कोणती काळजी घ्यावी याविषयी नागरिकांमध्ये अद्यापही संभ्रम आहे. त्यातच व्हॅक्सिन घेतल्यानंतर मद्यपान (alcohol) म्हणजेच ड्रिंक घेण्याविषयीदेखील अनेकांमध्ये गोंधळ उडाला आहे. त्यामुळे अनेक जण इंटरनेटवर लसीकरणानंतरच्या गाईडलाइन्स सर्च करत आहेत. परंतु, लसीकरणानंतर मद्यपान करणं हे घातक ठरु शकतं, असं 'इकोनॉमिक टाइम्स'च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. (corona vaccine important news alcoholics vaccine not impact body if u r more drinking)

कोविड लस (corona vaccine) घेण्यापूर्वी किंवा घेतल्यानंतर दारू प्यायल्यामुळे शरीरात विषाणूविरोधात तयार होणाऱ्या शक्तींवर त्याचा विपरीत परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, मद्याचा अतिरेक केल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर होऊ शकतो. लस घेतल्यानंतर शरीरात कोरोना विषाणू विरोधात लढणारे अॅटीबॉडीज तयार होत असतात. हे अॅटीबॉडीज तयार होण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे या काळात मद्यपान केल्यास ते शरीरासाठी घातक ठरू शकतं. इतकंच नाही तर, लसीमुळे निर्माण होणारे चांगले परिणाम शरीरात नीट पसरण्यासही अडथळा निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा: Veg - Non veg; रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवणारे पदार्थ

"लसीकरणावेळी जर अल्प प्रमाणात मद्यपान केलं तर फारशी अडचण येत नाही. परंतु, प्रमाणापेक्षा जास्त घेतली तर त्रास होऊ शकतो", असं कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर व्हायरस रिसर्चचे संचालक इल्हेम मेसाऊदी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी Moderate Drinking आणि heavy Drinking या दोन पद्धतींचा अर्थदेखील सांगितला.

Moderate Drinking म्हणजे काय ?

मॉड्रेट ड्रिंक्स म्हणजे मद्यपान करण्याचं ठराविक प्रमाण. कोरोना लस घेण्यापूर्वी व घेतल्यानंतर किती प्रमाणात दारु पिणं सुरक्षित आहे हे यात ठरवता येतं. त्यानुसार, मोड्रेट ड्रिंकिंगमध्ये पुरुषांनी दिवसातून २ वेळा व स्त्रियांनी दिवसातून १ वेळा मद्यपान करावे. परंतु, हे करतांनादेखील त्याचे प्रमाण अत्यल्प असावे.

heavy Drinking म्हणजे काय ?

हेवी ड्रिकिंगमध्ये पुरुष दिवसाला ४ किंवा त्यापेक्षा जास्त तर महिला दिवसाला ३ किंवा त्यापेक्षा जास्त मद्यपान करु शकतात. परंतु, लसीकरणादरम्यान इतकं मद्यपान करु नये.

आतापर्यंत करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये जास्त मद्यपान करणाऱ्या व्यक्तींच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असते. यासाठी माकड व उंदीर यांच्यावर काही प्रयोगही करण्यात आले. कॅलिफोर्नियामध्ये माकडांवर रिसर्च करण्यात आला, त्यात जास्त दारू पिणाऱ्या माकडांवर लसीचा कोणताही परिणाम जाणवला नाही. तर, कमी दारु पिणाऱ्या माकडांमध्ये अॅंटीबॉडीज लगेच तयार झाल्याचं पाहायला मिळालं.