Couple Lifestyle : लग्न ठरलेल्या जोडप्यांनी या बदलांना रहावे तयार; तरच टिकेल नातं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Couple Lifestyle : लग्न ठरलेल्या जोडप्यांनी या बदलांना रहावे तयार; तरच टिकेल नातं

Couple Lifestyle : लग्न ठरलेल्या जोडप्यांनी या बदलांना रहावे तयार; तरच टिकेल नातं

पूणे : लोक रिलेशनशिपमध्ये येतात आणि एकमेकांना डेट करायला लागतात. तेव्हा त्यांचे आयुष्यही बदलू लागते. डेटिंग असो किंवा लग्न, रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर दोघांच्या आयुष्यात बरेच बदल होतात. सुरुवातीचे काही दिवस नात नवं असतं.

हेही वाचा: Couple : जोडीदारासोबत फिरण्याचा प्लॅन असेल तर 'या' ठिकाणी जरुर भेट द्या!

नव्याचे नऊ दिवस चांगले अगदी मजेत एकमेकांना समजून घेण्यात जातात. एकमेकांना काय आवडत, काय नाही याची काळजी घेतली जाते. पण कालांतराने नातं जूनं होतं आणि मग नात्यात स्पेशल असं काहीच उरत नाही. अशावेळी आपली माणसं कधीही समजवायला येत नाहीत.

हेही वाचा: Bollywood Couple : पार्टनर्ससाठी वापरतात हे क्यूट निकनेम्स

आतापर्यंत सिंगल लाईफ एन्जॉय करणाऱ्यांना भविष्यातील पार्टनरचाही विचार करावा लागतो. लग्न झाल्यावरही अनेकजण आपण सिंगल आहोत असेच वागतात. त्यामुळे लग्न झाल्यानंतर कोणते बदल करायला हवेत. याबद्दल जाणून घेऊयात.

हेही वाचा: Newly Couple Rides Bullock Cart: नव वधू वराची बैलगाडीत सवारी

लग्नांनंतर लोक जोडीदाराच्या वेळेशी जुळवून घेऊ लागतात. सकाळी उठण्याची वेळ, नाश्ता करण्याची, जेवणाची या वेळा एकच होतात.त्यामुळे जोडीदाराचा विचार करून त्याप्रमाणे त्याच्या वेळेशी जुळवून घेणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा: Pune: महापालिकेला जाग; पाषाण तलावावरुन 'Couples not allowed' चे फलक हटवले!

सिंगल लाइफमध्ये पती-पत्नीवर कसलीही जबाबदारी नसते. पण लग्नानंतर एकमेकांची जबाबदारी त्यांच्यावर येते. जोडीदाराच्या गरजा, त्याला हवं नको पाहणे याची जबाबदारी घ्यावी लागते.

हेही वाचा: Lifestyle: प्रमाणापेक्षा जास्त घाम येतोय?

अनेकदा आपल्याला आवडत नाहीत त्या गोष्टी जोडीदाराला आवडू लागतात. त्यामुळे त्यातही बदल करावा लागतो. पतीला अ‍ॅक्शन चित्रपट आवडत असेल तरी ती आवड बाजूला सारून तो पत्नीच्या आवडीचा रोमँटिक चित्रपट पाहतो.लग्नाआधी मित्र कलीग यांना देण्यात येणारी प्राथमिकता लग्नानंतर रिलेशनशिपमध्ये जोडीदाराला द्यावी लागते.