Cracked Feet
Cracked Feet Esakal

Cracked Feet Home Remedy: हिवाळा आला! टाचांच्या भेगापासून तुम्ही आहात त्रस्त? मग करा हे सोपे घरगुती उपाय…

हिवाळ्यात टाचांना भेगा पडल्यात? जाणून घ्या हे सोपे घरगुती उपाय!

आपण आपल्या त्वचेची हिवाळ्यामध्ये खूप काळजी घेतो. आपली त्वचा हिवाळ्यात जर कोरडी पडली तर अनेक त्रास होतात. त्वचेवर रॅश येणे, अंगाला खाज सुटणे, त्वचा पांढरी पडणे यांसारखे अनुभव येऊ शकतात. यामध्ये पायाच्या टाचांना भेगा पडणे हा अगदी सगळ्यांनाच होणारा त्रास आहे. हा त्रास हिवाळ्यामध्ये वातावरणामध्ये ओलावा कमी असल्यामुळे वाढू लागतो. हिवाळ्यात हा त्रास तुम्हाला होऊ नये, यासाठी जाणून घ्या काही घरगुती उपाय…

मध पायांचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करेल

मध मॉइश्चरायझर म्हणून काम करतो. याशिवाय ते त्वचेला खोल पोषण देते. यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि ती मऊ दिसते.

मधासह मॉइश्चरायझिंग मास्क बनवण्यासाठी साहित्य-

  • 1 टीस्पून मध

  • १/२ हळद

  • 1 टीस्पून एलोवेरा जेल

मॉइश्चरायझिंग मास्क कसा बनवायचा-

  • प्रथम १ इंच आल्याचा तुकडा किसून घ्या आणि एका भांड्यात त्याचा रस पिळून घ्या.

  • आता त्यात मध आणि कोरफडीचे जेल टाकून चांगले मिसळा.

  • पाय धुतल्यानंतर आणि कोरडे केल्यानंतर, हा मास्क आपल्या पायावर पूर्णपणे लावा. वर हळदीची पेस्ट लावा.

  • तुमच्या टाचांना प्लास्टिकच्या रॅपने गुंडाळा किंवा तुम्ही मोजे घालू शकता.

  • 2-3 तासांनंतर आपले पाय स्वच्छ करा आणि मॉइश्चरायझिंग क्रीम लावायला विसरू नका.

Cracked Feet
Black Pepper: काळी मिरी जरी असली गुणकारी तरी जास्त सेवनाने दुष्परिणाम पडतील भारी, जाणून घ्या

मलई पायांचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करेल

मलईमध्ये फॅटी ऍसिड असतात, जे हायड्रेशन प्रदान करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. कोरड्या आणि फ्लॅकी त्वचेचे पोषण करते आणि त्यात असलेल्या लैक्टिक ऍसिडमुळे त्वचा सुधारते. हे त्वचेचे एक्सफोलिएट करून डेड स्किन सेल्स काढून टाकण्याचे काम करते.

मॉइश्चरायझिंग मास्क बनवण्यासाठी साहित्य-

  • 2 चमचे मलई

  • 1 टीस्पून साखर

  • 1/2 टीस्पून हळद

मॉइश्चरायझिंग मास्क बनवण्याची पद्धत-

  • मलई दोन वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजित करा. एका भागात साखर घालून मिक्स करा. दुसऱ्या भागात हळद घालून मिक्स करा.

  • आता प्रथम पाय स्वच्छ करा आणि पायावर साखर आणि मलई लावा आणि 10 मिनिटे राहू द्या. नंतर 2-3 मिनिटे पाय घासून कोरडे करा.

  • यानंतर मलई आणि हळद यांचे मिश्रण पायांवर लावा आणि 20 मिनिटे तसेच राहू द्या. आता पाय कोमट पाण्याने धुवून स्वच्छ करा.

  • आता खोबरेल तेल किंवा कोणत्याही चांगल्या मॉइश्चरायझिंग लोशनने तुमचे पाय मॉइश्चरायझ करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com