नातीगोती : नात्यांमध्ये दुरावा नको

एकत्र बसून जेवण्याबरोबरच आणखी एक नियम आमच्या घरात आम्ही पाळतो तो म्हणजे
family
familysakal

दक्षता जोईल

मला असं वाटतं, की कुटुंबव्यवस्था जितकी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या तत्त्वांवर टिकून आहे, त्याच तोडीला घरातली स्त्री ही उत्तम सक्षम, भक्कम आणि वेळप्रसंगी कठोर वागणारी हवी- ज्यामुळे घरात प्रगती आणि भरभराट होते, आणि घरात प्रसन्न वातावरण नेहमी असतं.

माझे आई- बाबा, लहान बहीण यामध्ये मी विभागणी नाही करू शकत नाही; कारण अनेक प्रसंगांमध्ये या तिघांसोबत अतिशय हृद्य बंध जुळलेले आहेत. त्यांच्यासोबतचे काही प्रसंग मी आवर्जून सांगते. एकदा माझ्या बाबांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यांना उभंही राहता येत नव्हतं. तरीही ते माझ्यासोबत माझ्या शूटिंग लोकेशनवर आले आणि शूटिंग संपेपर्यंत सोबतच होते. आई माझी शिक्षिका आहे; पण कधी माझी ऑडिशन असेल आणि मला त्या ऑडिशन लोकेशनचा पत्ता माहीत नसेल, तर ती तिचं सगळं काम सांभाळून माझ्यासाठी तिथं नेहमी हजर राहिली आहे. माझी लहान बहीण प्रचीती नेहमी घरात काहीही आणलं असेल, तर त्यातला एक भाग माझ्यासाठी बाजूला ठेवते.

एकत्र बसून जेवण्याबरोबरच आणखी एक नियम आमच्या घरात आम्ही पाळतो तो म्हणजे जेवताना टीव्ही नाही लावायचा. आम्ही त्या वेळात दिवसभरात आपापल्या आयुष्यात काय घडलं, याबाबत बोलतो. आम्ही सहकुटुंब सहपरिवार कधीकधी सहलीसाठीही जातो आणि तेव्हा सगळे काही ना काही पदार्थ बनवून आणतात. सहलीत आम्ही एकत्र गप्पागोष्टी करतो. आमच्या कुटुंबात अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

मी सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेत निशिगंधा खोट हिची भूमिका साकारत आहे. आम्ही अनेकदा नातेवाइकांकडे जातो. कारण मी टीव्ही कार्यक्रमात काम करत असल्यानं त्यांना फार उत्साह असतो मला भेटण्याचा. विशेषतः जे प्रवास करू शकत नाहीत त्यांचा. त्यामुळे आम्ही सुटीच्या दिवशी कधी-कधी त्यांना भेटायला जातो आणि मग त्यानंतर वेळ काढून जेवण करायला एक छान जागी जातो. मी बाहेरगावी शूटिंगला जाते, तेव्हा हे जाणवतं, की घरात लागणारी झोप दुनियेत कुठेही येत नाही. आईनं बनवलेले पदार्थ किती ऊर्जा देतात.

नातेसंबंध चांगले होण्यासाठी मी कुटुंबाला खूप वेळ देते. शूटिंगवरून आल्यावर मी कधीच मोबाईल घेऊन नाही बसत. सुटी असेल, तेव्हा कुटुंबासाठी काहीतरी छान पदार्थ बनवते. माझा सुटीचा दिवस माझ्या कुटुंबाकरिता असतो.(शब्दांकन : अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com