डेटिंग अ‍ॅपपासून चुंबनापर्यंत लोकांनी गुगलवर सर्च केले अनेक प्रश्न

२०२१ मध्ये नातेसंबधांबाबत लोकांनी गुगलवर अनेक गोष्टी सर्च केल्या
Google Most searched
Google Most searchedGoogle

कोरोना साथीमुळे गेली २ वर्ष लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे बहुतांश लोकं घरात आहेत. आताही लॉकडाऊनचे(Lockdown) निर्बंध शिथिल झाले तरी अनेक लोकं घरूनच काम करत आहेत. साथरोगाचा नातेसंबंधांवरही (Relationship) परिणाम झाला. नात्यात चढ उतार आले. त्यामुळे इंटरनेटचा आधार घेत अनेकांनी वेगवेगळ्या समस्यांवर उपाय शोधले. नातेसंबधांवर आधारित २०२१ मध्ये गुगलवर अनेक गोष्टी लोकांनी सर्च (Google Search)केल्या. ते प्रश्न लोकांच्या रोजच्या आयुष्याशी निगडीत होते.

Google Most searched
Dating Trend 2022: डेटिंग ट्रेंड बदलतोय?जाणून घ्या काय आहे कारण?
Dating App
Dating AppTeam eSakal

चांगले डेटिंग अ‍ॅप्स कोणते? What are the best dating apps?

अनेक डेटाबेस वेबसाईट्सनुसार, हा प्रश्न सर्वात जास्त गुगल सर्च केला गेला. बंबलपासून, टिंडर ते लग्न जमविण्याच्या वेबसाइट्सपर्यंत लोकांनी खूप सर्च केला. फक्त भारतातलेच नाही तर जगभरातील लोकांचे डेटिंग जीवन धोक्यात आले होते. घरातच अडकून पडलेले अनेक लोक एकटे पडले होते. म्हणून प्रिय व्यक्तींशी संवाद साधणे त्यांना फार गरजेचे आणि अत्यावश्यक वाटले.

Google Most searched
नवरा असावा तर अस्सा... मुली शोधतात अशा प्रकारचा पार्टनर
Love
Loveesakal

चुंबन कसे घ्यायचे? (How to kiss?)

कुतूहलाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे चुंबन घेताना लोकांना पार्टनरला सोडावेसे वाटत नाही. त्यामुळे हा प्रश्न दुसरा सर्वात लोकप्रिय प्रश्न ठरला. या प्रश्नाची अनेक उत्तरे होती. चुंबनाचे योग्य तंत्र, टिप्स अशा विविध चुंबन कौशल्यांवर लोकांनी काम केले.

Google Most searched
नवरा असावा तर अस्सा... मुली शोधतात अशा प्रकारचा पार्टनर
dating
datingesakal

ती/तो मला आवडतो का? (Does he/she like me?)

सर्वचजण घरात असल्यामुळे अनेक गोष्टी आभासी कराव्या लागत असल्याने एकमेकांच्या भावनांचा अंदाज बांधणे कठीण होते. म्हणूनच तो किंवा ती प्रतिसाद कसा देतो हे लक्षात ठेवून लोकं मॅसेजेस आणि फोनवर बोलुन जे लक्षात आले ते गुगलला विचारून लोकांनी तो किंवा ती आवडतंय का? याचे आखाडे बांधले.

Google Most searched
अशी जपा लाँग डिस्टन्स रिलेशनशिप; नात्यांमधली ओढ ठेवा टिकवून
long distance relationship
long distance relationshipesakal

लॉंग डिस्टन्स रिलेशनशीप कशी वर्क होईल? (How to make a long distance relationship work?)

जर बंधने असतील तर लॉंग डिस्टन्स रिलेशनशीप मध्ये राहणे हे मजेशीर नाहीच. बंधने आल्यामुळे कोविड 19 मुळे अनेक जोडप्यांना लॉंग डिस्टन्स रिलेशनशीप करावे लागले. त्यातून काहींना फायदा झाला तर काही दु:खात हरवले. त्यांना ही गोष्ट आपल्यासाठी योग्य नसल्याची जाणीव झाली. आपले प्रेम गमावण्याच्या भीतीने, लोकांनी लॉंग डिन्स्टन्स रिलेशन कसे टिकेल याबाबत अनेक प्रश्न गुगल केले. आणि त्यावर उपाय शोधून मार्ग काढला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com