esakal | लॉकडाउनमध्ये Dating app चा वापर वाढला, व्हिडीओ कॉलही वाढले
sakal

बोलून बातमी शोधा

Dating app

लॉकडाउनमध्ये Dating app चा वापर वाढला, व्हिडीओ कॉलही वाढले

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: देशात मागील वर्षापासून कोरोनाने सर्वांचेच आयुष्यच बदलून टाकले आहे. यामध्ये समाजातील विविध घटकांचा समावेश होतो. या काळात सर्व शाळा-कॉलेज बंद आहेत. तसेच नोकरी करणारे बरेच जण घरून काम करत आहेत. यामुळे लोकांचा बाहेरच्या वातावरणाशी संपर्क या काळात तसा कमीच आला. लॉकडाउनच्या सुरवातीला तरुणांना पहिले काही दिवस बऱ्याच चांगले गेले. पण जसजसा लॉकडाउनचा काळ वाढत गेला तसा घरी असूनही एकटेपणाची जाणीव होऊ लागली. मित्र-मैत्रिणीनींशी गप्पा, भेटणे, फिरणे या गोष्टी बंद झाल्या होत्या. याचाच परिणाम म्हणजे कोरोनाकाळात डेटींग ऍपच्या वापरात भारतात लक्षणीय वाढ झालेली आहे.

कोरोनाकाळात डेटिंग ऍपचा वापर वाढला आहे

कोरोनाकाळात डेटिंग ऍपचा वापर वाढला आहे

लॉकडाउनकाळात डेटिंग ऍपचा वापर वाढला-

लॉकडाउनमुळे किंवा कडक निर्बंधांमुळे अनेकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. तर दुसरीकडे मोबाईलवर विविध ऍपचा वापरही वाढताना दिसला. यामध्ये देशातील तरुणाई विविध डेटिंग ऍपवर वेळ घालवताना दिसत आहेत. तसेच लॉकडाउच्या काळात डेटिंग ऍपचे डाउनलोडचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. टिंडर (Tinder) या डेटिंग ऍपच्या वापरात या काळात देशात ३९ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच या ऍपवर बोलण्याचे प्रमाण २८ टक्क्यांनी वाढले आहे. एकटेपणा घालवण्यासाठी बरेच तरुण आणि वयस्कर लोकही या ऍपचा वापर करताना दिसत आहेत.

हेही वाचा: PHOTOS: मेस्सी, छेत्री की रोनाल्डो? पाहा सर्वाधिक गोलस्कोरर

व्हिडीओ कॉलचे प्रमाण वाढले-

तसेच मागील वर्षी मार्च महिन्यात टींडरवर स्वाईपची संख्याही कोटींनी वाढली आहे. याचबरोबर OkCupid या डेटींग ऍपच्या वापरात मार्च ते मे महिन्यात ७०० टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. प्रत्यक्षात भेटणे जरी शक्य नसले तरी कोरोनाकाळात ऑनलाईन डेटींगचे प्रमाणही वाढल्याचे दिसते. तसेच लॉकडाउनमुळे व्हिडीओ कॉलचे प्रमाण वाढले आहे. Bumble या साईटवर व्हिडीओ कॉलचे प्रमाण ३८ टक्क्यांनी वाढल्याची नोंद आहे. बरेच जण या काळात विविध डेटींग ऍपच्या माध्यमातून चांगले मित्रही झाले आहेत.

'धोके'ही अनेक-

लॉकडाउनमध्ये जसा लोकांचा डेटींग ऍपचा वापर वाढत गेला तसा त्यात बऱ्याच जणांना वाईट अनुभवही आले. प्रसिद्ध डेटींग ऍप टिंडरने काढलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की, ऍपचा वापर करताना ३८ टक्के मुली आणि महिलांनी वाईट अनुभव आले आहेत. तर याचे प्रमाण पुरुषांमध्ये २६ टक्के आहे. तसेच २५ टक्के महिला सदस्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावं लागल्याचे सांगितले आहे. त्यामुळे उपलब्ध डेटिंग ऍपचा वापर करताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तसेच प्रसिद्ध डेटिंग ऍप अजून सुरक्षितता कशी वाढवता येईल याच्यावर काम करत असल्याचे दिसते.

कोरोनाकाळात डेटिंग ऍपकडे नकळतच ओढले गेले. प्रचंड मोकळ्या वेळेमुळे डेटिंग ऍपवर सह वावरणं झालं. इथे काही व्यक्ती भेटले, ओळख झाली. निश्चित वारंवारीतेने आम्ही संवाद साधत राहिलो. मग निर्बंध शिथिल झाल्यानंतर भेट वगैरे झाली. चांगली मैत्री झाली.

- चैताली

लॉकडाउनमुळे कॉलेज बंद झालं होतं. मित्र-मैत्रिणी घरी असल्याने कॉल खूप कमी होत होते. या काळात मी तीन डेटिंग ऍपचा वापर केला. पण म्हणावा तसा प्रतिसाद न आल्याने मी या ऍपचा वापर करणे बंद केले.

-अंकुश

loading image
go to top