Deepika Padukone: सहाव्या महिन्यात हाय हिल्स घातल्याने दीपिका ट्रोल, गरदोरपणात हिल्स घालणे सुरक्षित आहे का?

Deepika Padukone Troll For High Heels: नाग अश्विनच्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये हाय हिल्स घातल्याने दीपिका चांगलीच ट्रोल झाली आहे.
Deepika Padukone
Deepika Padukone Sakal

Side Effects of Wearing Heels While Pregnant: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सध्या तिच्या प्रेग्नन्सीमुळे खुप चर्चेत आहे. दीपिकानं अलिकडेच नाग अश्विनच्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये हजेरी लावली. या इव्हेंटमधील दीपिकाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या इव्हेंटमध्ये सहाव्या महिन्यात हाय हिल्स घातल्याने दीपिका चांगलीच ट्रोल झाली आहे.

या इव्हेंटमध्ये दीपिकाने काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस आणि हाय हिल्स घातले होते. यामुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे. अनेक यूजर्सनी लिहिले की दीपिकाने अशा काळात घट्ट कपडे आणि हाय हिल्स घालणे टाळावे. कारण गरोदरपणात असे करणे आरोग्यदायी नसते.

Instagram

अनेक महिला सुंदर दिसण्यासाठी हाय हिल्स घालतात. तर काही महिला गरोदरपणात देखील हाय हिल्स घालताना दिसतात. पण असे करणे खुप धोकादायक ठरू शकते. हेल्थ एक्सपर्टनुसार हिल्स घालणे गरोदर महिलांसाठी समस्या निर्माण करू शकतात. जाणून घेऊया हेल्थ एक्सपर्टन गरोदर महिलांना हाय हिल्स घालण्यास मनाई का करतात?

पाठदुखी

नेहमी हाय हिल्स घातल्याने पाठदुखीचा त्रास वाढू शकतो. तसेच गरोदरपणात वजन झपाट्याने वाढते. अशा परिस्थितीत जर तुम्ही हाय हिल्स घालत असाल तर ओटीपोटाचे स्नायूवर ताण येतो तसेच पाठदुखीची समस्या वाढू शकते.

शरीराचा तोल

गरोदरपणात हाय हिल्स घालणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. वजन वाढल्याने शरीरात अनेक बदल होतात. अशावेळी हाय हिल्स घालून चालणे अवघड होऊ शकते.

पाय सुजणे

गरोदरपणात अनेक महिलांच्या पायावर सुज येते. अयोग्य शूज किंवा चप्पलचा वापर केल्यास असे होते. यामुळे गरोदरपणात घट्ट शूज किंवा हाय हिल्स घालणे टाळावे.

गर्भपात

गरोदरपणात हाय हिल्स घातल्यास गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो. कारण हाय हिल्समुळे चालणे अवघड होते. अशात जर शरीराचा तोल जाऊन तुम्ही पडलात तर गर्भपात होऊ शकतो. यामुळे आरामदायक चप्पल किंवा शूज घालणे चांगले असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com