एकटेपणामुळे नैराश्य आलंय? या पद्धतीने करा डिप्रेशनवर मात

आता नैराश्यावर करा सहज मात!
Depression
Depression
Updated on

सध्याच्या काळात प्रत्येक जण आपआपल्या कामात बिझी झाला आहे. त्यामुळे अनेक जण इच्छा असूनही कुटुंब आणि मित्रपरिवाराला पुरेसा वेळ देऊ शकत नाही. याचाच परिणाम व्यक्तीच्या मानसिकतेवरही होताना दिसतो. कामाचा ताण, जीवलगांशी असलेला दुरावा यामुळे अनेक जण नैराश्याचा म्हणजेच डिप्रेशनचा depression सामना करु लागले आहेत. त्यातच नोकरीनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त कुटुंबापासून दूर असलेल्या असंख्य जणांना सध्या एकटेपणा त्रासदायक ठरत आहे. म्हणूनच एकटेपणामुळे आलेलं नैराश्य कशाप्रकारे दूर करावं ते पाहुयात. (depression what to do to reduce depression when you are alone)

१. व्यायाम करा -

डिप्रेशन दूर करायचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे व्यायाम करा. नियमितपणे व्यायाम केल्यामुळे शरीरात डोपामाइन या हार्मोन्सचं स्राव सुरु होतो. यालाच हॅप्पी हार्मोन्सदेखील म्हटलं जातं. त्यामुळे नियमित व्यायाम केल्यामुळे तुमच्यातील सकारात्मकता वाढू लागेल व हळूहळू डिप्रेशन दूर होईल.

२. ध्यान करा -

मेटिडेशन केल्यामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होतात ज्यामुळे नैराश्य दूर होण्यास मदत मिळते. तसंच एकाग्रता वाढते.

३. पाळीव प्राण्यांचा सांभाळ करा -

आनंदी राहण्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे पाळीव प्राणी. जर तुम्ही नैराश्यात असाल हे नैराश्य दूर करण्यासाठी पाळीव प्राणी तुमची मदत करु शकतात. प्राण्यांना जरी बोलता येत नसलं तरीदेखील ते तुमच्या भावना समजू शकतात व त्यानुसार ते रिअॅक्ट करत असतात.त्यांच्या नजरेत प्रेम, आपुलकी पटकन दिसून येतं. त्यामुळे नैराश्यातून बाहेर यायचं असेल तर पाळीव प्राण्यांना बेस्ट फ्रेंड बनवा.

४. बागकाम करा -

बागकाम केल्यामुळे देखील लक्ष काही काळासाठी दुसरीकडे वेधलं जातं. तसंच झाडांच्या, मातीच्या संपर्कात आल्यामुळे मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे बागकामात स्वत:चं मन रमवा.

५. गाणी ऐका -

अनेक जण डिप्रेशनमध्ये गेल्यावर सॅड साँग ऐकतात. परंतु, अशा वेळी उडत्या चालीची, जुन्या काळातील, रोमॅण्टिक गाणी ऐकण्यावर भर द्या. गाणी ऐकल्यामुळे मन प्रफुल्लित होण्यास मदत मिळते. परिणामी, डिप्रेशनमधून व्यक्ती हळूहळू बाहेर येऊ लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com