पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण अधिक?

...म्हणून स्त्रियांमध्ये नैराश्याचं प्रमाण जास्त असतं
depression
depression
Updated on

सध्याच्या काळात डिप्रेशन ही सर्वसामान्य समस्या झाली आहे. साधारणपणे १० व्यक्तींच्या मागे १ व्यक्ती नैराश्यग्रस्त असल्याचं पाहायला मिळतं. नैराश्यामुळे व्यक्तीच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम होत असून यात स्त्रियांचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून येतं. म्हणूनच, पुरुषांपेक्षा स्त्रियांमधील डिप्रेशनचं प्रमाण जास्त का आहे यामागील कारणं जाणून घेऊयात.(depression why women are more depressed than men)

१. हार्मोन्समधील बदल-

एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचा परिणाम आपल्या हर्मोन्सवर होत असतो. त्यामुळे अनेकदा स्त्रियांचे मूड स्विंग्स होतात. त्यातच या हार्मोन्सची पातळी कमी झाल्यावर स्त्रियांमध्ये मूड डिसऑर्डरचीही समस्या निर्माण होते. इतकंच नाही तर मासिक पाळी, मेनोपॉजच्या काळातही स्त्रियांना डिप्रेशन येऊ शकतं.

२. सामाजिक तुलना-

समाजात कायमच स्त्री-पुरुष यांच्यात भेदभाव केला जातो. त्यामुळे अनेकदा स्त्रियांना डिप्रेशन येण्यामागे हे महत्त्वाचं कारण ठरु शकतं. स्त्रियांनी कितीही मेहनतीने एखादं काम केलं किंवा यश मिळवलं तरीदेखील तिला कमीपणा देण्यात येतो किंवा पुरुषांच्या कामासोबत त्याची तुलना केली जाते. त्यामुळेच स्त्रियांना डिप्रेशन येण्यामागे हे महत्त्वाचं कारण आहे.

३. अनुवांशिक कारण -

कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला डिप्रेशनची समस्या असेल तर ही अनुवांशिकरित्या हा त्रास स्त्रियांमध्येही निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. महिलांच्या जीन्समुळे त्यांना ही समस्या उद्भवू शकते.

४. मानसिक कारण-

पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया भावनिकरित्या जास्त हळव्या असतात. त्यामुळे कोणत्याही घटनेचा परिणाम त्यांच्या मनावर लगेचच होतो. त्यातच नात्यात चढउतार आले तर स्त्रिया लगेच डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com