
डॉ. राजश्री पाटील - प्राध्यापक, एसएनडीटी महिला विद्यापीठ
‘घर’ म्हणजे आपला अवकाश. आपल्या परिचयाच्या जागा इथं असतात. घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी त्या सोयीच्या असतात. थोडक्यात, आपला तो कम्फर्ट झोन असतो. मन आणि शरीर सैल करता येण्याची ही जागा असते. यांत झोपण्याच्या खोलीचा मोठा वाटा असतो. इथला आपला वावर अनौपचारिक असतो. एका घरात एक स्वयंपाकघर आणि एक दिवाणखाना असतो. परंतु, बेडरूम्स मात्र अनेक असू शकतात. घरात ज्येष्ठ मंडळी असतात, कर्ती माणसं आणि लहान किंवा तरुण मुलं-मुली असतात. त्यामुळे त्या-त्या वयोगटासाठी म्हणून वेगवगेळ्या पद्धतीनं झोपण्याच्या खोलीची अंतर्गत रचना करावी.