मानसिक आरोग्यातील फरक

ॲडोलेसंट म्हणजे किशोरवयीन मुलींमध्ये नैराश्य आणि इटिंग डिसॉर्डरचे प्रमाण; तसेच मुलांपेक्षा आत्महत्याविषयक विचार आणि प्रयत्नांचे प्रमाण जास्त असते.
Mental Health
Mental Healthsakal

- डॉ. मलिहा साबळे, मानसिक आरोग्यतज्ज्ञ, संस्थापक व संचालक - द हेल्दी माइंड

ॲडोलेसंट म्हणजे किशोरवयीन मुलींमध्ये नैराश्य आणि इटिंग डिसॉर्डरचे प्रमाण; तसेच मुलांपेक्षा आत्महत्याविषयक विचार आणि प्रयत्नांचे प्रमाण जास्त असते. किशोरवयात मुलींपेक्षा मुलांमध्ये रागाची समस्या, उच्च जोखमीच्या वर्तनात गुंतण्याची आणि आत्महत्या करण्याची अधिक शक्यता असते. किशोरवयीन मुलींमध्ये अंतर्बाह्य लक्षणे असण्याची शक्यता असते, तर किशोरवयीन मुलांमध्ये कृती करण्याची अधिक शक्यता असते.

प्रौढावस्थेत स्त्रियांमध्ये नैराश्य आणि चिंतेची वारंवारता लक्षणीयरीत्या जास्त असते, तर पुरुषांमध्ये पदार्थ वापर विकार (सबस्टन्स युजर डिसॉर्डर-एसयूडी) आणि असामाजिक वर्तनाचे प्रमाण अधिक असते. आनुवंशिक आणि जैविक कारणांमुळे स्त्रियांमध्ये नैराश्य आणि चिंताग्रस्त विकारांचे प्रमाणही जास्त असते.

काही अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे, की मासिक पाळीच्या दरम्यान मूड स्विंग हार्मोनल बदलांशी संबंधित आहेत. मनोसामाजिक आणि हार्मोनल घटकांच्या परस्परसंवादामुळे जन्मपूर्व आणि प्रसवोत्तर नैराश्याचा धोका वाढतो. पुनरुत्पादकविषयक आरोग्याच्या समस्यांमुळे महिलांना लक्षणीय मानसिक त्रास आणि विकारांचाही सामना करावा लागतो. वंध्यत्व आणि हिस्टेरेक्टॉमीचा संबंध स्त्रियांमध्ये न्युरोटिक विकारांच्या वाढीव जोखमीशी जोडला गेला आहे. अमेरिकेतील अभ्यासानुसार, मूत्राशय नियंत्रणाच्या समस्या असलेल्या प्रौढांमध्ये, वृद्ध पुरुषांपेक्षा वृद्ध स्त्रियांमध्ये अधिक सामान्य विकार, अधिक मानसिक त्रास आणि नैराश्याची चिन्हे दर्शवितात.

अशा रिसर्चच्या निरीक्षणांमध्ये पुरुष आणि स्त्रियांमधील बरेचसे फरक दर्शवले गेले; पण शेवटी एकच तात्पर्य आले, की पुरुष किंवा स्त्रिया मानसिक आजारांना बळी पडण्याचे कारण कोणतेही असले, तरी तेव्हा एका चांगल्या कौटुंबिक पाठबळाने आणि व्यावसायिक सपोर्टने त्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देऊन त्यात होणाऱ्या अडचणींतून बाहेर पडायचे प्रयत्न चालूच ठेवावेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com