Different Culture : इथले लोक अनेक वर्षांपासून संपूर्ण शरीरावर राम नाम का गोंदवून घेत आहेत?

ते खोटे बोलत नाहीत आणि मांस खात नाहीत
Indian Tradition Ramnami
Indian Tradition Ramnami esakal

Different Culture :

भारतातील लोक आणि त्यांच्या पंरपरांना जूना इतिहास आहे. भारतातील अनेक परंपरा आजही आपल्याला विचार करायला भाग पाडतात. आपली संस्कृती, वेद, मंत्र आपल्याला मानसिक समाधान मिळवून देतात. देवाचे नामस्मरण केलं की आपले दु:ख विसरायला होतं असं म्हटलं जातं.

लवकरच, अयोध्येत श्री राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यानिमित्तानेच आपण भारतातील एका अशा लोकांच्या जमातीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी राम नामाचा जपच केला नाही. तर, शरीरावर सर्वत्रच राम नाम गोंदवून घेतलं आहे. आम्ही छत्तीसगडच्या रामनामी पंथाबद्दल बोलत आहोत. ज्यांच्यासाठी राम-राम आणि राम हे नाव त्यांच्या संस्कृती, परंपरा आणि सवयीचा भाग आहे.

Indian Tradition Ramnami
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य राम नेमाडे यांचे निधन

या समाजाच्या कानाकोपऱ्यात राम वास करतो. रामनामी समाजातील लोक आपल्या शरीराच्या प्रत्येक भागावर रामाचे नाव गोंदवतात. एवढेच नाही तर त्यांच्या घराच्या भिंतींवर आणि अंगावर पांघरलेल्या चादरीवरही रामाचे नाव आहे.

रामाच्या नावाने अभिवादन करण्याची परंपरा देशभरात पाळली जाते, पण या समाजात राम इतका रुजला आहे की ते प्रत्येक व्यक्तीला राम नावाने हाक मारतात. या पंथाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा राम मंदिर किंवा अयोध्येचे राजे नाही तर, वृक्ष वनस्पती, निसर्ग आणि माणसे आहेत.

परंपरा कशी सुरू झाली?

भारत स्वातंत्र्य होण्याआधी अन् त्यानंतरही अनेक वर्ष भारतातील लोकांना अस्पृश्यतेची वागणूक देण्यात येत होती. त्यावेळी देवांच्या दर्शनासाठी तर सोडाच देवाचे नाव घेतले तरी लोक महापाप झाल्यासारखे लोकांना वाळीत टाकत होते.

ज्यावेळी लोकांनी भारतात देवांसाठी चळवळ उभी झाली तेव्हा दलित म्हणून वर्गीकृत लोकांच्या वाट्याला मंदिरे किंवा मूर्ती आल्या नाहीत. इतकेच काय, तर मंदिराबाहेर उभे राहण्याचा अधिकारही या लोकांकडून काढून घेण्यात आला आहे.

Indian Tradition Ramnami
अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाचे दिवे पेटवण्याची जोरदार तयारी सुरू असतानाच महाराष्ट्रात लोकशाहीचे दिवे विझवले; सामनातून टिकास्त्र

सुमारे एक शतकापूर्वी, या रामनामी समुदायाला एक छोटी जात घोषित करण्यात आली आणि त्यांना मंदिरांमध्ये प्रवेश नाकारण्यात आला, याशिवाय, त्यांना पाण्यासाठी जातीय विहिरी वापरण्यास देखील मनाई करण्यात आली. मंदिर धर्माचे सर्व मार्ग बंद झाल्यावर त्यांची प्रभू रामावरील श्रद्धा सुरू झाली.

आजही भारतातील काही भाग असे आहेत की, जेथे लहान जातीच्या लोकांच्या तोंडातून देवाचे नाव निघाले तर पाप समजले जाते. अशा स्थितीत रामनाम धारण करून ज्यांना रामनामी म्हणतात, त्यांनी मंदिर आणि मूर्ती या दोन्हींचा त्याग करून आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक अंगामध्ये रामाचा वास केला.

आपली ओळख प्रभू रामापासून वेगळी होऊ नये, जिकडे पाहावे तिकडे फक्त रामच दिसावा यावर ठाम आहेत. सुमारे 20 पिढ्यांपासून हा समाज या परंपरेचे पालन करत असून राम हेच नाव त्यांना देशात आणि जगात वेगळी ओळख देत आहे. हा समाज संत दादू दयाल यांना आपले मूळ पुरुष मानतो.

हा संप्रदाय केवळ अंगावर रामाचे नाव गोंदवून घेत नाही तर अहिंसेचा मार्गही अवलंबतो. ते खोटे बोलत नाहीत आणि मांस खात नाहीत. अंगावर कोरलेले राम नाव आणि डोक्यावर बसलेला मोरमुकुट एवढीच ओळख असलेल्या या समाजाचा विचित्रपणा पाहायचा असेल तर छत्तीसगडच्या काही गावांमध्ये होणाऱ्या भजन मेळ्यात नक्की सहभागी व्हा.

Indian Tradition Ramnami
Ayodhya Ram Mandir Prasad : घरबसल्या मिळणार अयोध्या राम मंदिरातील प्रसाद, तोही अगदी मोफत! असं करा ऑनलाईन बुकिंग

1890 च्या सुमारास रामनामी पंथाची स्थापना झाली

1890 मध्ये, परशुराम या दलित तरुणाने याची सुरूवात केली असे सांगण्यात येते. रामनामी समाजातील लोक मूर्तीपूजा आणि मंदिरात जाण्यावर विश्वास ठेवत नाहीत, परंतु शरीरावर रामाचे नाव गोंदवून घेणे, हा त्यांच्या परंपरा आणि संस्कृतीचा भाग आहे. या समाजात जन्मलेल्या लोकांना शरीराच्या राम नाम गोंदवणे आवश्यक आहे. मुले 2 वर्षांची होईपर्यंत त्यांच्या छातीवर रामाचे नाव गोंदवून घेणे बंधनकारक असल्याची परंपरा आहे.

नव्या पिढीबरोबर त्यांची परंपरा नामशेष होत चालली आहे

आज शहरांमध्ये टॅटू काढणे हा फॅशनचा भाग असला तरी शतकानुशतके चालत आलेल्या या समाजाची परंपरा नव्या पिढीला अंगीकारता येत नाही. टॅटूमुळे होणाऱ्या त्रासामुळे काही लोक ही प्रथा सोडत आहेत तर काही लोक नोकरीमुळे ती सोडत आहेत.

रामनामी समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी कायदेशीर नोंदणीही झाली आहे. ते दर 5 वर्षांनी आपला प्रमुख निवडतात आणि आपल्या प्रमुखाचे सर्व निर्णय ऐकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com