अर्थपूर्ण पर्स : खर्चावर नियंत्रण ठेवणंही आवश्यक

डिजिटल व्यवहारांच्या सुलभतेत हरवलेली खर्चजाणीव; रोख व्यवहार, नोंदवही आणि आर्थिक शिस्तीतून ‘अर्थपूर्ण पर्स’चा शोध
Digital payments make life easier, but mindful spending and financial discipline are the real keys to saving money.

Digital payments make life easier, but mindful spending and financial discipline are the real keys to saving money.

Sakal

Updated on

फाल्गुनी घाटे-सोळस्कर

आजच्या डिजिटल युगात पैशाचे व्यवहार जेवढे सोपे झाले आहेत, तेवढंच त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं कठीण झालं आहे. एका क्लिकवर पैसे पाठवणं किंवा पेमेंट पूर्ण करणं इतकं सहज झालं आहे, की खर्च करताना आपल्याच खिशातून पैसे जात आहेत, ही जाणीवच अनेकदा राहत नाही. याचाच अनुभव मला माझी नोकरी सुरू झाल्यापासून आला. आलेले पैसे महिन्याच्या वीस तारखेपर्यंत खर्च होऊन जायचे आणि महिनाअखेरीला नेमके एवढे पैसे आपण कधी आणि कसे खर्च केले याची सुसंगती लागायची नाही. असं काही महिने होत राहिलं आणि पैसे जात राहिले. सतत यूपीआय पेमेंट होत होतं. मग मात्र ठरवलं, की आता यावर आळा घातलाच पाहिजे आणि मी पैशाबद्दल स्वतःच स्वतःला शिस्त लावायची ठरवली. एक मात्र कळून चुकलं होतं, की खर्च करणं जितकं सोपं, तितकंच खर्चावर नियंत्रण ठेवणं अधिक आवश्यक असतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com