
Diwali Rangoli Design:
Sakal
Diwali 2025 Rangoli Design: सण समारंभ हा रांगोळीशिवाय अपूर्णच असतो. खरं तर रांगोळीमुळे सणाचा आनंद अधिक वाढतो. दिवाळीत घराची सजावट ही रांगोळी आणि दिव्यांनी केली जाते. रांगोळीत विविध रंग वापरले जातात. रांगोळीशिवाय दिवाळी हा सण अपुर्णच मानला जातो. यंदा फुलांचा वापर करून लहान ते मोठ्या सुंदर रांगोळ्या काढू शकता. या रांगोळ्या काढणे खुप सोपे असते. तसेच दिसायला देखील आकर्षक असतात. घराच्या अंगणात फुलांच्या रांगोळ्या घराची शोभा वाढवतात. पण फुलांची रांगोळी काढायला कोणते फुले वापरावे आणि फुलांचे काय महत्व आहे हे जाणून घेऊया.