Diwali Bhaubeej 2020 : भाऊबीजेला भावाला खास गिफ्ट्स द्याच

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

या सणाच्या दिवशी सलग चार दिवस धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिपावली पाडवा आणि भाऊबीज हे सर्वजण एकत्र येऊन आनंदाने उत्सव साजरे करतात. यामध्ये भाऊबीज हा सण बहीण भाऊ यांच्यातील नातं आणखीन मजबूत करणारा दिवस.

पुणे : वर्षभरामध्ये अनेक सण असतात. त्यात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा सण म्हणजे दिवाळी. या सणाच्या दिवशी सलग चार दिवस धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिपावली पाडवा आणि भाऊबीज हे सर्वजण एकत्र येऊन आनंदाने उत्सव साजरे करतात. यामध्ये भाऊबीज हा सण बहीण भाऊ यांच्यातील नातं आणखीन मजबूत करणारा दिवस. दिवाळीमधील या दिवशी प्रत्येक बहीण ही भावाला भेटण्यासाठी आपल्या घरी येते.

तसेच बहीण लहान असो वा मोठी आपल्या भावाला या दिवशी ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. ओवाळणी केल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो. तसेच हल्ली भावासोबत बहीणही भाऊबीजेनिमित्त भावाला गिफ्ट घेत आहेत. तुम्ही ही विचार करत असला ना. आपणही कोणती भेटवस्तू घ्यायला हवी? चला तर मग या आयडिया तुम्हाला भेटवस्तू घेण्यासाठी मदत करतील.   

घड्याळ

भाऊबीजेनिमित्त तुम्ही भावाला घड्याळ भेट देऊ शकता. त्याला कोणत्या कंपनीचे घड्याळ आवडतो, त्यानुसार तुम्ही घड्याळ खरेदी करू शकाल. त्याच्या आवडीनुसार भेटवस्तू घेतल्यास त्याला जात आनंद होईल. सध्या मार्केटमध्ये आणि ऑनलाईन ही नवनवीन स्टाईल्सचे घड्याळ आलेले आहेत. तसेच दिवाळीमध्ये डिस्काउंट ही मिळत असल्यामुळे तुम्ही घड्याळ खरेदी करू शकाल. 

वॉलेट
 
भाऊबीजेचं गिफ्ट म्हणून वॉलेट ही चांगला पर्याय आहे. सध्या ही अनेक मुले पैसे, स्मार्ट कार्ड्स ठेवण्यासाठी वॉलेटचा वापर करताना दिसून येत आहे.  मार्केटमध्ये आणि ऑनलाईन ही चांगल्या कंपनीचे वॉलेट खरेदी करता येतील. 

फिटनेस स्मार्ट बँड

प्रत्येक बहीणीला आपला भाऊ लहान असो व मोठा त्याची काळजी असते. मात्र, ती त्याची काळजी घेण्यासाठी नेहमी त्याच्यासोबत राहू शकत नाही. परंतु, तुमचा भाऊ जर फिटनेस फ्रिक असेल तर तुम्ही त्याला फिटनेस स्मार्ट बँड गिफ्ट म्हणून देऊ शकता. हे गिफ्ट त्याला नक्की आवडेल. 

मोबाईल

सध्या ऑनलाईन शॉपींगमध्ये अॅमेझॉन, फ्लिपकार्डवर मोबाईल खरेदी करताना डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे कमी पैशात चांगल्या क्वालिटीचा स्मार्टफोन खरेदी करून तो भावाला गिफ्ट करू शकता. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला अनेक व्हरायटीज मिळतील. त्यानुसार तुम्ही खरेदी करू शकाल. 

लॅपटॉप 

जर तुमचा भाऊ नोकरी करत असेल किंवा शिक्षणासाठी त्याला लॅपटॉप लागत असेल तर तुम्ही भावाला लॅपटॉप गिफ्ट करू शकता. दिवाळी मध्ये ऑनलाईनखरेदी करताना वस्तूंवर डिस्कॉऊंट देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या भावासाठी लॅपटॉप खरेदी करू शकाल. 

जॅकेट 

सध्या फॅशनच्या जमान्यात मुले ही जॅकेट घालण्यास प्राधान्य देत आहेत. लग्न समारंभ तसेच घरातील एखादे कार्यक्रम असेल त्यावेळी भावाला जॅकेट घालण्याची आवड असेल तर तुम्ही त्याला ब्रँडेड जॅकेट गिफ्ट करू शकता. तुम्ही जर आपल्या भावाच्या आवडत्या रंगाचं जॅकेट घेतलं तर ते त्याला अधिक आवडेल आणि हे गिफ्ट त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरेल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali Bhaubeej 2020 This year give special gifts to your beloved brother