

Diwali Makeup Tips | No-Makeup Look
sakal
HOW TO GET A NATURAL GLOW WITHOUT HEAVY MAKEUP: दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारे पाडवा आणि भाऊबीज हे दोन्ही सण खास नात्यांचा गोडवा आणि आनंद साजरा करण्याचे असतात. दिवाळी पाडव्याला पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि आपुलकी जपली जाते, तर भाऊबीजेला बहीण-भावाच्या नात्यातील प्रेमाचा सोहळा रंगतो. या खास दिवशी सुंदर पारंपरिक कपडे, दागिने आणि आकर्षक लूक करण्याची महिलांची तयारी सुरू असते. मात्र, सुंदर दिसण्यासाठी नेहमीच हेवी मेकअप करण्याची गरज नाही. यंदाच्या दिवाळीत कमी मेकअपमध्येही चेहऱ्याचं नैसर्गिक सौंदर्य खुलवायचं असेल, तर ट्राय करा ट्रेंडिंग 'नो मेकअप लूक'!