दिवाळीच्या फराळातील मुख्य पदार्थ असतो चिवडा. चिवडा अनेक प्रकारचा असतो. गोड तिखट चवीचा रूचकर असा चिवडा प्रत्येकाला आवडतो. काही लोक दिवाळीला फक्त चिवडाच खातात. तर काही लोक चिवड्यासोबत गोड बुंदीचे लाडू फस्त करतात. तिखट गोड चव देणारा असा हा चिवडा अनेकवेळा बनवायला चुकतो.
कारण, चिवड्यासाठी लागणारा प्रत्येक जिन्नस योग्य प्रमाणात असेल तरच चिवडा चांगला बनतो. त्यामुळे, चिवड्याचे परफेक्ट प्रमाण कसे बनवायचे हे पाहुयात. (Diwali 2024)
चिवड्याकरता पातळ पोहे अर्धा किलो, पाव किलो शेंगदाणणे भाजून सालं काढून, १०० ग्रॅम सुक्या खोबऱ्याचे पातळ काप, १०० ग्रॅम डाळ, ५० ग्रॅम काजू पाकळी (ऐच्छिक), १ टे. स्पून धने, जिरे पावडर, १ टे. स्पून तीळ, ५० ग्रॅम हिरव्या मिरच्या तुकडे करून, कढीलिंब, पिठीसाखर व मीठ चवीनुसार, १ वाटी रिफाईंड तेल अथवा शेंगदाणा तेल, मोहरी, हिंग, हळद फोडणीकरता.
कृती :
चिवडा करायच्या आधी एक दिवस पोहे चाळून स्वच्छ निवडून दिवसभर उन्हात ठेवावेत. (२) पसरट कढईत २-२ मुठी पोहे घालून मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजावेत व एका पसरट तसराळ्यात काढावेत. दाणे भाजून सोलून घ्यावेत खोबऱ्याचे काप, मिरच्यांचे तुकडे तयार ठेवावेत.
कढईत सर्व तेल तापत ठेवावे. भाजून सोललेले दाणे मंद आचेवर तेलात तळून पोह्यांवर टाकावेत. खोबऱ्याचे काप मंद तळून पोह्यांवर टाकावेत. नंतर पोह्यांवर धने, जिरे पावडर, मीठ व पिठीसाखर चवीनुसार घालून पोहे हलवावेत.
उरलेल्या तेलात मोहरी, हिंग, मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता घालावा. मिरच्या तळल्या गेल्या की तीळ व डाळ टाकावे. फोडणी परतून त्यात १ टी-स्पून हळद घालावी. तयार पोहे व दाण्यांच्या मिश्रणावर फोडणी घालावी. झाऱ्याने सर्व बाजूंनी तसराळ्यात पोहे नीट ढवळून फोडणी व मीठ, साखर सर्वत्र नीट मिसळले गेले पाहिजेत. काजू घालायचे असल्यास सर्वात शेवटी घालावेत.
मिश्रण व्यवस्थित हलवून फोडणी कमी वाटलीच तर लगेच १ टे. स्पून तेलाची नुसती फोडणी करून चिवड्यावर घालून नीट ढवळावे. गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरावा.
चिवड्याचे पोहे गरम फोडणीत, पातेल्यात घातले तर बरेच वेळा आवळून कडकडीत होतात. ह्या पद्धतीने चिवडा केल्यास पोहे कधीही आवळत नाहीत. फोडणीत मीठ, साखर घातले तर चिवड्यात मीठ व साखरेचे गोळे आढळतात पोह्यांवर मीठ, साखर घातल्याने एका ठिकाणी गोळे न होता सर्वत्र सारखी लागते.
▶ पोहे अगोदर भाजल्याने चिवडा कुरकुरीत होतो. पोहे न तळल्याने तेलकट होत नाही.
वरील चिवड्यात पोह्याच्या पापडाची छोटी मिरगुंडं तळून टाकली तर चिवडा खमंग व चविष्ठ लागतो.
लहान मुलांच्या दृष्टीने हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे नसतील तर लाल तिखट घातले तरी चालते. लाल तिखट धन्या-जिऱ्याच्या पावडरीबरोबर पोह्यावरच टाकावे म्हणजे फोडणीत न जळता सर्वत्र सारखे मिसळते. वरील पातळ पोह्याच्या चिवड्यात आवडत असल्यास उन्हात कुरकुरीत वाळवलेले पांढरे छोटे चुरमुरे मिसळले तरी चिवडा चांगला होतो. चुरमुरे साधारण २ वाट्या घ्यावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.