
दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी सर्वजण आपापल्या इच्छेनुसार घरोघरी लक्ष्मीपूजन करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच अश्विन अमावस्या संध्याकाळी योग्य मुहूर्तावर जर तुम्ही लक्ष्मीची पूजा केली तर तुमच्या घरातील लक्ष्मी कायम टिकून राहते, आणि आपल्याला वर्षभर सुख समृद्धी ऐश्वर्य आरोग्य धनसंपदा प्राप्त होते.
दिवाळीतील मुख्य दिवस म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवसाला मान आहे. लक्ष्मीपूजन केल्याने घरातील नकारात्मकता आणि आर्थिक संकटे दूर होतात, अशी भावना आहे. त्यामुळे, लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाची विशेष तयारी केली जाते. अन् पुजेची मांडणीही केली जाते.
आज आपण दिवाळी तील लक्ष्मीपूजन साध्या सोप्या पद्धतीने कसे करायचे ते पाहणार आहोत. योग्य पद्धतीने आणि विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा करणार आहोत त्याबरोबरच मंत्र कोणते म्हणावे, याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
या दिवशी सायंकाळी योग्य मुहूर्तावर लक्ष्मीचे तसेच कुबेर पूजन देखील केले जाते. यावर्षी शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी लक्ष्मीपूजन केले जाणार आहे. शुक्रवारी एक तारखेला सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ पर्यंत तुम्हाला कधीही लक्ष्मी पूजा करता येईल.
धन संपत्ती आणि समृद्धीची देवता लक्ष्मीची उपासना करण्याचा हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या दिवशी अगदी मनोभावे लक्ष्मीपूजन करायचे आहे. अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सगळीकडे संचार करते. आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.
तसेच देवीला स्वच्छता आणि शांतता प्रिय आहे, जिथे असे घर असेल तिथेच लक्ष्मी निवास करते .त्यामुळे या दिवशी लक्ष्मीपूजनाची मांडणी करण्यापूर्वी आपल्याला आपले घर स्वच्छ करून घ्यायचे आहे. सर्व केर कचरा घरातून काढून टाका, म्हणजे या दिवशी अलक्ष्मी घराबाहेर जाते अन् लक्ष्मी घरात येते.
लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती
गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती
कुबेराचा फोटो किंवा मूर्ती
नाणी आणि नोटा
दागिने किंवा चांदीची नाणी
एक कोरी वही घ्यावी त्यावर कुंकवाने ओम काढावा किंवा स्वस्तिक काढावा.
चौरंग किंवा पाठ
लाल रंगाचे कापड
पाणी
तांदूळ, गंध
पंचामृत, हळद, कुंकू
अक्षदा, फुले
विड्याची पाच पाने
झाडू, लाह्या बताशे
प्रथम जिथे पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून पाट मांडून घ्या. पाटावर लाल कापड अंथरावे.पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती माता लक्ष्मीचा फोटो ठेवा. पाटावर उजव्या बाजूला कळस मांडावा त्या कळसांमध्ये पाच विड्याची पाने ठेवावी. एक रुपयाचे नाणे टाकावे. आणि कळसाच्या वर नारळ ठेवावा त्या नारळाची शेंडी वर असायला हवी.
आपण जो चौरंग घेतला आहे, त्या चौरंगावर मध्यभागी तांदुळाची रास करावी. त्यावर गणपती, कुबेर, लक्ष्मी यांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. जर तुमच्याकडे काहीच नसेल तर सुपारी ठेऊ शकतात.
त्यानंतर चौरंगावर विड्याची पाने मांडावी. त्यावर पाच प्रकारची पाच फळे ठेवावीत. यानंतर बाजूला हिशोबाची वही आणि पेन ठेवावे. तसेच एका ताटात धनं टाकून पैसे नाणी ठेवावीत. त्यांची पूजा करावी. त्यानंतर देवीलाही हळद कुंकू लावून पूजा करून घ्यावी.
दिवाळीचा फराळ आणि लाह्या बताशे यांचा नैवेद्य दाखवावा. झाडूला लक्ष्मी मानतात म्हणून नवीन झाडूची पूजा केली जाते. त्यामुळे देवीच्या फोटोच्या बाजूलाच झाडूही ठेवावा. पाटाकडेला समया लावाव्यात.
तुम्ही पाटावर देवीचा फोटो ठेवत असताना, त्याची पूजा करत असताना ‘श्री लक्ष्मी देवेय नम:’, किंवा या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ हा मंत्र म्हणू शकता.
देवीसमोर मंत्र वाचन केल्यानंतर मनातील इच्छा देवीपूढे बोलून दाखवा. अन् तिच्याकडून सौभाग्य, धन-धान्य, पोरं बाळ यांचा आशिर्वाद मागून घ्या. त्यानंतर घरातील सर्वांना प्रसाद म्हमून खडी साखर,फुटाणे द्यावे. किंवा फराळातील पदार्थ, किंवा पेढे मिठाई द्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.