Diwali Shopping 2023 : पुणेकर असो वा पुण्यात नवीन, दिवाळीच्या शॉपिंगसाठी याहून स्वस्त मिळणार नाही कुठे डील

पुण्यात नेमकं बजेट शॉपिंगसाठी कुठे जायचं ते जाणून घेऊयात
Diwali Shopping 2023
Diwali Shopping 2023esakal

Diwali Shopping 2023 : दिवाळी हा भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार सण. दिवाळीच्या महिन्याभरापूर्वी दिवाळीच्या खरेदीला सुरुवात होते. ही खरेदी फक्त कपड्यांपूर्ती मर्यादित नसते. तर घराची सजावट, फराळ आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. तुम्ही अजून खरेदी केली नसेल तर ही ठिकाणं तुमच्यासाठी बटेज शॉपिंगचा बेस्ट ऑप्शन ठरतील. चला तर पुण्यात नेमकं बजेट शॉपिंगसाठी कुठे जायचं ते जाणून घेऊयात.

दिव्यांची खरेदी

दिवाळीत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दिवे. आता हे दिवे कुठून विकत घ्यावेत असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर उत्तर आहे तुळशीबाग. रंगीबेरंगी आणि सुंदर आकाराचे दिवे घेण्यासाठी थेट तुळशीबागेच्या बाजारात जा. तुम्ही इथे मेटल डायसह तोरण आणि वॉल-हँगिंग्ज देखील पाहू शकता. शिवाय कुंभारवाडा, लक्ष्मी रस्ता अशा ठिकाणांनाही तुम्हीला या गोष्टी स्वस्त मिळतील.

Diwali Shopping 2023
Diwali Shopping 2023

लाइट्स आणि डेकोरेशन

आपण आपली घरे स्वच्छ केल्यावर दिवाळीत घराची सजावट सजावट करतो. यासाठी बुधवार पेठेला भेट द्या. हे पुण्यातील कायम गजबजलेले ठिकाण असते. इथे सजावटीची ६० पेक्षा जास्त दुकाने आहेत. चांगल्या कलेक्शनसाठी तापकीर गल्लीमध्ये जा, इथे तुम्हाला हवे ते मिळेल. तुम्हाला इथे झुंबर, पुरातन कंदील आणि क्रिस्टल वॉल लाइट देखील मिळतील. शिवाय, उत्कृष्ट सजावटीच्या वस्तूंसाठी J.P DeMello आणि Address Home ला भेट द्या.

Diwali Shopping 2023
Diwali Shopping 2023

पुजेचे साहित्य

घरात दिवाळीत पारंपारिक पूजा असेल, तर तुम्ही पूजा थाळी, लक्ष्मी आणि भगवान गणेशाच्या आणि विधीसाठी इतर साहित्यासाठी हडपसरला जावे. होलसेल दरात फुले घेण्यासाठी तुम्ही गुलटेकडी मार्केटमधील फुलांच्या मार्केटला देखील भेटू शकता, तुम्ही पूजेसाठी विविध प्रकारची फुले वापरू शकता.

Diwali Shopping 2023
Diwali Shopping 2023

रांगोळी

उत्तम रांगोळी रंगांसाठी लक्ष्मी रोडला जा. येथील बाजारपेठेत रांगोळीसोबत वापरण्यासाठी केवळ रंगच नाही तर इतरही आवश्यक वस्तू आहेत. रांगोळी स्टॅम्प्स, स्टिकर्ससाठी तुम्ही तुळशीबाग मार्केटला देखील भेट देऊ शकता. या साहित्याच्या मदतीने तुम्ही सहज रांगोळी काढू शकता.

Diwali Shopping 2023
Diwali Shopping 2023

कपड्यांची खरेदी

दिवाळीच्या सणाला प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या परिस्थितीनुसार कपडे विकत घेतोच. ट्रेंडी, क्लासी फॅशनेबल कुर्त्यासाठी बाजीराव रोडच्या फॅशन स्ट्रीट मार्केटला एकदा नक्की भेट द्या. जर तुम्ही साडी नेसण्यास उत्सुक असाल, तर तुम्ही पैठणी साड्या, सिल्क साड्या, डिझायनर साड्या इत्यादींसाठी लक्ष्मी रोडला भेट दिली पाहिजे. या व्यतिरिक्त, कोरेगाव पार्कच्या बोळीमध्ये फॅन्सी कपड्यांच्या दुकानांना भेट देण्याची संधी अजिबात गमावू नका.

Diwali Shopping 2023
Diwali Shopping 2023

दागिने

दिवाळीसाठी तुम्ही सगळी खरेदी तर केलीच पण आता दागिने राहिलेत. उत्तम आणि फॅशनेबल ज्वेलरीसाठी तुळशीबाग स्ट्रीट मार्केटपासून सुरुवात करा, जिथे तुम्हाला विविध प्रकारचे झुमके, बांगड्या, पैंजण, अंगठ्या, नेकलेस, बिंदी आणि बरेच काही मिळेल. याव्यतिरिक्त, लक्ष्मी लेनसह कॅम्प मार्केटमधील साई ज्वेलरी आणि महाराजा ज्वेलर्स, अस्सल दागिन्यांसाठी व्हिजिट द्या.

Diwali Shopping 2023
Diwali Shopping 2023

चपला जोड्यांची खरेदी

पुण्यातील इतर बाजारपेठांबरोबरच, फर्ग्युसन कॉलेज रोडला चपला जोड्यांसाठी तुम्हाला एकापेक्षा एक भारी ऑप्शन्स मिळतील . दिवाळीत भरतकाम केलेले शूज, चप्पल आणि सँडलसाठी M.G रोडच्या क्लोव्हर सेंटरला भेट द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com