
Simple Window Cleaning Hacks for Diwali |Window Cleaning Tips
sakal
Window Cleaning Tips: दिवाळी म्हटली की फराळ, घराची सजावट, रोषणाई, रंगीबेरंगी कपडे, रांगोळी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घराची साफसफाई. दिवाळीचा फराळ संपल्यानंतर घरातील प्रत्येक खोलीची साफसफाई सुरू होते. यात मुख्यतः घराच्या कानाकोपऱ्यातील जाळी-जळमटं, कपाटं, आणि दारं-खिडक्या स्वच्छ केल्या जातात.
परंतु सध्या अनेक घरांमध्ये स्लाईडिंगच्या खिडक्या जास्त पाहायला मिळतात. यामुळे घरात धूळ कमी येते, पण दिसायला आकर्षक असल्या आणि घरातील धूळ कमी करत असल्या तरी, साफसफाईच्या वेळी त्रासदायक ठरतात.