esakal | Lover बद्दल मित्राला सांगताय? 'लव सिक्रेट' शेअर करण्याआधी हे वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

मित्र-मैत्रिणींसोबत लव्ह सिक्रेट शेअर करताय? 'ही' घ्या काळजी

मित्र-मैत्रिणींसोबत लव्ह सिक्रेट शेअर करताय? 'ही' घ्या काळजी

sakal_logo
By
टीम इ सकाळ

Secret Rules Of Love Life: प्रेम आणि विश्वास या दोन गोष्टींवर कोणतेही नाते टिकते. पण कित्येकवेळा नात्यामध्ये कोणी तिसरा व्यक्ती येतो तेव्हा गोष्टी खूप नात्यामध्ये गैरसमज वाढत जातात. मग तो व्यक्ती तुमचा जिवलग मित्र/मैत्रीण का असेना. तुमचे मित्र-मैत्रिणीं आणि कुटुंबातील लोक नकळतपण तुमचे नाते खराब करतात आणि त्याची जाणीव खूप उशीरा होते. त्यामुळे आपल्या नात्याबाबतच्या गोष्टी तिसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करु नका. कोणत्या मित्र-मैत्रिणींसोबत तुमच्या नात्याबाबतच्या गोष्टी शेअर करू नये याबाबत जाणून घेऊ या.

आपल्या लव्ह लाईफबद्दल 'या' मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करू नका

ज्या मित्र-मैत्रिणींना तुम्हाला दुसऱ्यांसोबत पाहून ईर्षा वाटते

तुम्हाला दुसऱ्यांसोबत पाहून ज्या मित्र-मैत्रिणींना ईर्षा वाटते त्यांच्यासोबत तुमची लव लाईफ शेअर करू नका. अशा लोकांसोबत तुमची लव लाईफ शेअर केल्यास तुमचे नाते खराब होऊ शकते. अशा मित्र-मैत्रिणींसोबत वेगळे प्लॅन करा. तुमची लव लाईफ अशा लोकांसोबत मिक्स करू नका हे कायम लक्षात ठेवा. तुमची मैत्री आणि तुमची लव लाईफ वेगळी ठेवा.

लव लाईफबाबत प्रत्येक छोटी-मोठी माहिती जाणून घेणारे :

मैत्रीच्या नात्याने तुमच्या लव लाईफबाबत प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट शेअर केली पाहिजे अशी अपेक्षा तुमच्या काही मित्र-मैत्रिणींना असते. पण रिअॅलिटीमध्ये हेच लोक प्रेमाचे शत्रू असतात. अशा लोकांमुळे तुमच्या पार्टनरचा तुमच्यावरील विश्वासाला तडा जातो.

मनमानी करणारे मित्र-मैत्रिणी :

कित्येक वेळा आयुष्यात काही मित्र-मैत्रिणी असे भेटतात ज्यांना तुमच्या आयुष्याचा त्यांच्या मनाप्रमाणे असावे असे वाटते. तुम्हाला काहीच कळत नाही असे दाखवून हे मित्र-मैत्रिणी तुमच्यावर स्वत:ची मत लादतात. दुसऱ्यांचे विचार तुमच्यावर थोपले जावू, हे लक्षात ठेवा. मग तो मित्र असो की साथीदार. लक्षात ठेवा, तुमच्या प्रेमीच्या मनात काय आहे हे तुमच्या मित्र-मैत्रिणींना जाणून घेण्याची काहीच आवश्यकता नाही. ही गोष्ट स्वत: समजून घ्या आणि मित्र-मैत्रिणींही समजवा.

सारखे सल्ले देणारा मित्र-मैत्रिणी

महत्त्वाच्या गोष्टींवर मित्र-मैत्रिणींचा सल्ला घेणे वाईट गोष्ट नाही. पण प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी आपल्या मित्र-मैत्रिणींचा सल्ला घेत असाल तर तुमच्या पार्टनरसोबत तुमचे नाते खराब होऊ शकते.

loading image
go to top