esakal | उन्हाळ्यात उष्णतेच्या पुरळ कमी करण्यसाठी करा 'हे' घरगुती उपचार

बोलून बातमी शोधा

summer
उन्हाळ्यात उष्णतेचे पुरळ कमी करण्यसाठी करा 'हे' घरगुती उपचार
sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: सध्या उन्हाळा सुरू असल्याने सगळीकडे कडाक्याचे गरमी आहे. एकीकडे कोरोनामुळे घराच्या बाहेर पडणं अवघड झालं आहे तर दुसरीकडे उकाड्यामुळे घरी राहवत नाहीये. अशात घामामुळे येणाऱ्या घामुळ्या त्रास देतात. या घामोळ्यांवर घरगुती उपाय कोणते आणि त्याच्यावर कशी मात करायची ते आज आपण जाणून घेऊया.

१. ओटमील-

पोष्टिक नाश्त्यासोबत याचे अनेक फायदेही आहेत. हे नाजूक त्वचेसाठी उत्तम आहे. यात असणाऱ्या फिनोल गुणामुळे हे उन्हाळ्यातही उपयोगी ठरते.

कसं वापरायचे?

- पाण्यात ओटमील मिसळून अंघोळ करा.

- कमीत - कमी १५ ते २० मिनीटे शरीराला पाण्यात ठेवा.

- अंघोळीनंतर शरीर व्यवस्थित वाळू द्या.

- तसेच उन्हाळ्यातील त्रास कमी करण्यासाठी ओटमीलने त्वचेवर तुम्ही स्क्रबही करू शकता.

२. चंदन पावडर-

हे देखील उन्हाळ्यात शरीराला चांगला थंडावा देऊ शकते. याची पेस्ट करून लावावी. यातील माइश्चराइजिंग गुण तुमच्या त्वचेची काळजी घेतात. तसेच उन्हाळ्यात याचा मोठा फायदा होतो. हे घामुळ्यासोबत शरीराच्या खाजेलाही कमी करते.

कसं वापरायचे?

- जिथं घामुळ्या आहेत तिथं चंदन पावडर लावावी.

- चंदन पावडरला पाणी किंवा गुलाब पाण्यात मिसळून घ्यावे.

- या मिश्रणाला जिथं जास्त त्रास होत असेल त्याठिकाणी लावावे.

- या पेस्टचा उपयोग दिवसातून दोनदा करावा.

३. बेकिंग सोडा-

बेकिंग सोडाही यावर एक उपाय आहे, जे घामुळ्या कमी करण्यास मदत करते. हे शरीरावरील डेड स्किनला काढून टाकते. तसेच याचे सूदिंग आणि एंटी-इंफ्लेमेटरी गुण घामुळ्यापासून सुटका करण्यास मदत करतात.

कसं वापरायचे?

- अर्धा कप बेकिंग सोडा पाण्यात मिसळा.

- तसेच तुम्ही बेकिंग सोड्यासोबत लवेंडर तेलाचे एक चमचा मिसळून अंघोळ करू शकता.

- लवेंडर तेलाचे एंटी-फंगल गुण तुमच्या शरीरावरी पोर्स साफ करण्यास मदत करते.