कधी विचार केलाय जीन्स पॅन्टला का असतो छोटा खिसा; कशासाठी असतो तो, जाणून घ्या सविस्तर

Do you know history of jeans pants
Do you know history of jeans pants

पुणे : फॅशनच्या दुनियेत बाजारात रोज नव्याने नवनवीन फॅशन पाहायला मिळते. मार्केटमध्ये रोज कोणता ना कोणता ट्रेंड सुरूच असतो. पण फॅशनमधील एक चलती आजही तितक्याच जोमाने स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवली आहे. ती म्हणजे जीन्स. कितीही फॅशन येवो पण जीन्सची चलती आजही तितकीच आहे. लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण जीन्स वापरण्यास पसंती देतात. 

जर तुम्हाला जीन्स पॅन्ट घालण्याची आवड असेल तर तुम्ही नक्कीच पाहिले असेल की जीन्सच्या उजव्या बाजूस एक खिसा असतो. बरोबर ना, परंतु आपण कधी विचार केला आहे का? जीन्समध्ये या छोट्या खिशाची कल्पना का केली गेली असेल? तुमच्या मनात हा विचार नक्कीच आला असेल की प्रत्येक जीन्समध्ये खिशांचा हा प्रकार का असतो? आता या प्रश्नाचे उत्तर 1873 मध्ये डेनिम जीन्स उत्पादित करणाऱ्या जगातील पहिल्या उत्पादक लिवई स्ट्रॉस अँड कंपनीने दिले आहे.

अशी झाली सुरुवात

डेनिम्स, म्हणजेच जीन्सचे बनविलेले ट्राउझर्स ज्याला डंगरी असेही म्हणतात. तर फ्रान्समध्ये गनोइझ नेव्हीच्या कामगारांनी ही जीन्स घातली होती, कारण हा त्यांचा गणवेश होता. पूर्वी जीन्स निळ्या रंगांमध्येही बनविली जात होती. कारण पूर्वी मेहनती कामगारांचे कपडे लगेच खराब होत असल्यामुळे हा वर्ग जीन्स वापरत होते. म्हणून निळ्या जीन्स त्यांच्यासाठी बनविलेले होते जेणेकरून त्यांचे कपडे लवकर खराब होऊ नयेत. त्याच वेळी निळा रंग देण्यासाठी इंडिगो डाईचा वापर केला जात होता.
  
फॅशनमध्ये अशी आली जीन्स

16 व्या शतकात, जीन्सचा ट्रेंड सुरु झाला. त्याच वेळी 1850 पर्यंत जीन्स खूप लोकप्रिय झाली होती. त्यानंतर 1950 मध्ये जेम्स डीनने हॉलिवूड चित्रपट 'रब्बल विथड ए कॉज' बनविला, ज्यामध्ये जीन्स पहिल्यांदा फॅशन म्हणून वापरल्या गेल्या. यापूर्वी कोळसा खाणीत काम करणारे विविध प्रकारचे मजूर जीन्स वापरत असत. त्याचवेळी, जेव्हा लोकांनी हा चित्रपट पाहिला तेव्हा अमेरिकेच्या तरुणांना जीन्स खूप आवडली आणि तिथे जीन्सचा ट्रेंड सुरु झाला. 

जीन्सवर बंदी देखील होती

अमेरिकेतील शाळा, रेस्टॉरंट्स आणि थिएटरमध्ये जीन्स घालण्यास बंदी केली होती. परंतु जीन्सने लोकांमध्ये अशी जागा निर्माण केली की 1970 मध्ये ती फॅशन म्हणून स्वीकारली गेली.

म्हणूनच यासाठी असतो जीन्सवर एक लहान खिसा

आपण सहसा पाहिलेच असेल की जीन्सला चार मोठे खिसे असतात आणि उजव्या हाताला एक लहान खिसाही असतो. ज्यामध्ये लोक सहसा क्वाईन ठेवतात. पण हे खिसे का बनले हे तुम्हाला माहिती आहे का? कदाचित नाही, म्हणून मी तुम्हाला सांगते की पूर्वी हे खिसे वॉच ठेवण्यासाठी तयार केले गेले होते, जेणेकरून लोक त्यात आपले मनगटी घड्याळ ठेवू शकतील. परंतु आता बर्‍याच लहान गोष्टी ठेवण्यासाठी या खिशाचा वापर केला जात आहे.

अशा प्रकारे देण्यात आले जीन्सचे नाव
 
19 व्या शतकात फ्रेंच शहरातील निम्समध्ये याचा शोध लागला आहे. ज्या कपड्यांपासून जीन्स बनवलेल्या आहेत त्यास फ्रेंच भाषेत सर्ज असे म्हणतात आणि अशा नावाने त्यास सर्ज डी नाइम्स (Serge de Nimes) असे नाव दिले गेले. परंतु लोकांनी त्याचे नाव लहान करून डेनिम्स असे केले आहे.

जीन्सच्या चैनवरील YKK चा अर्थ

जर तुम्ही जीन्स पॅन्ट वापरत असेल तर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल की बहुतेक जीन्सच्या चैनवर YKK लिहिलेले असते. याचा अर्थ Yoshida Kogyo Kabushikikaisha आहे. हे या कंपनीचे नाव आहे, जी जगभरातील बहुतेक जीन्स निर्मात्यांसाठी चैन बनवते. म्हणूनच बहुतेक जीन्समध्ये हे नाव जीन्सच्या चैनवर लिहिलेले असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com