
Do You Know Why does milk overflow when boiled ? : घरात आई सांगून गेलेली असते की, गॅसवर दूध आहे लक्ष दे, आणि तूम्ही मोबाईलवर रील्स पाहण्याच्या नादात विसरून जाता. दूध उतू गेल्यावर आई ओरडतच येते. 'दूध उतू गेलेय. सगळी मलई वाया गेली आहे. फक्त पाणी उरले आहे, आता प्या फक्त पांढरे पाणी’, असे आई म्हणते. तेव्हा प्रश्न पडतो की, दूध उतू का जातं त्यावेळी त्यावरील मलई म्हणजेच साय उतू जाते?, पण दूध उकळत राहते असे का?
आपल्या रोजच्या जीवनात अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात. आपण त्यांना पाहतो पण त्यांची कारणे आपल्याला माहित नसतात. यातील एक म्हणजे दूध उतू जाणे. पण, हा नियम पाण्याला लागू होत नाही. पाण्याच्या बाबतीत असे होत नाही.
आई म्हणते तसं, दूध उकळल्यानंतर खरेच पाणी उरते का? त्यामागील शास्त्रीय कारण असे आहे की, दूधामध्ये फॅट्स, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे आणि अनेक प्रकारची खनिजे असतात. दूधात प्रामुख्याने चरबी कॅसिनचे कण असतात ते प्रथिनांच्या स्वरूपात आढळतात.
दूधात 87 टक्के पाणी, 4 टक्के प्रथिने, 5 टक्के लैक्टोज असते. दूधात अधिक प्रमाणात पाणी असल्याने ते गरम केल्यावर वाफेत रुपांतरीत होते. तर, उरलेली मलई, प्रथिने, कार्बोहायड्रेट, जीवनसत्व हे दूधाच्या घट्ट सायीच्या रुपात निर्माण होतात.
दूधात असलेले फॅट्स, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे वजनाने हलकी असतात. त्यामुळे ते दूध गरम होताच वर तरंगू लागतात आणि उतू गेल्यावर सायीच्या रूपात सगळे गुणधर्म नष्ट होतात. दूधात पाणी जास्त प्रमाणात असल्याने पाणी शिल्लक राहते अणि साय निघून जाते.
सगळे दूध का नाही जात उतू
आता प्रश्न पडतो की, उरलेले दूध उकळत राहते ते पूर्णपणे सांडत का नाही. तर, याचे उत्तर असे आहे की, पाण्यात कोणत्याही प्रकारची चरबी, प्रथिने, कार्बोहायड्रेट, जीवनसत्व नसते. त्यामुळे त्यावर एक थर तयार होतो आणि वाफेला बाहेर पडण्यासाठी जागा लागते. उकळत्या पाण्यात वाफ जाण्यास अडथळा नसल्याने ते भांड्यातच उकळत राहते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.