तुम्हाला DIGITAL DETOXची गरज आहे का? स्वत:ला विचारा हे प्रश्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

DIGITAL DETOX

तुम्हाला DIGITAL DETOXची गरज आहे का? स्वत:ला विचारा हे प्रश्न

तुम्हाला असे वाटते का की तुम्ही डिजीटल मिडियाच्या खूप अतिवापर करता आहात? कुटंब आणि मित्र- मैत्रिणींसोबत झूमिंग करणे, सतत सोशल मिडिया अकाउंट चेक करणे, कामासाठी वापर कमी, डिव्हाईसवर बातम्या वाचणे....हे सारे करताना तुम्हाला आपण या डिजिटल स्क्रिनच्या आहारी गेलो आहोत असे वाटणे सहाजिक आहे. पण हा अतिवापर तुमच्यासाठी समस्या केव्हा होईल? तेव्हा तुम्ही त्यापासून स्वत:ची सुटका कशी कराल?

आपण मीडिया कसा वापरतो आणि किती नाही यावर नकारात्मक परिणाम कसा होईल अवलंबून असतो, त्याचीच चिंता प्रत्येकजण करतो असतो अशी माहिती मीडिया मानसशास्त्रज्ञ डॉ. पामेला रुटलेज यांनी टीएमआरडब्ल्यूला सोबत बोलताना सांगितली.

तुमच्यासाठी काय योग्य आहे हे शोधण्यासाठी तुम्ही काय वापरता आणि का याचे प्रामाणिकपणे मूल्यांकन करणे आवश्यक आहे असेही त्यांनी पुढे सांगितले. सध्या डिजिटल डिटॉक्स ट्रेंडिंगमध्ये आहे. पण डिजिटल मीडियाच्या वापराबाबत नियोजन केल्यास खऱ्या अर्थाने डिजिटल डिटॉक्स शक्य आहे.त्यासाठी तुम्ही स्वत:ला हे 4 प्रश्न विचारा

1 . तुम्हाला असे वाटते का तुम्ही खूप वेळ स्किन वर असता?

काही दिवस मिडिया डायरी वापरुन बघा असा सल्ला तारखेची, वेळ, सोशल मिडिया प्लॅटफॉर्म, मिडिया वापण्याचा हेतू आणि तुम्हाला कसे वाटते यांती नोंद या डायरीतमध्ये ठेवा उदा. सार्वजनिक वाहतूकने प्रवास करताना तुम्हाला मनोरंजनाचे कार्यक्रम पाहायला आवडतात पण तुम्हाला सोशल मिडियावर पोस्ट चेक करण्यामध्ये वेळ वाया घालवल्याबद्दल तुम्हाला वाईट वाटते. एकदा तुम्ही कधी, कोणता मिडिया वापरता आणि का वापराता ही माहिती जमा झाली तर तुम्हाला समजेल की तुम्ही मिडियाच्या अधीन झाला आहात की नाही. कोणत्या अॅक्टिव्हीमध्ये तुमचा वेळ वाया जात आहे, कोणते सोशल मिडिया फ्लॅटफॉर्म वापल्यानंतर तुम्हाला चांगले वाटते किंवा चांगले वाटत नाही हे समजेल. या माहितीमुळे तुम्ही तुमच्या मिडिय वापरण्यावर नियंत्रण करु शकता.

2. तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी मिडिया मदत करतोय का?

तुम्ही ऑनलाईन खूप जास्त वेळ घालवत आहात असे तुम्हाला वाटते? असे वाटणे सहाजिक आहे. परपस्पर संवादी आणि उच्च दर्जाचा कॉन्टेंट तुम्हाला खिळवून ठेवतो पण गरजेचे नाही की हे वाईट लक्षण असणे असे गरजेचे नाही. पण जर ते तुम्हाला तुमच्या कामापासून आणि तुम्हाला ज्या गोष्टींपासून दूर ठेवत असेल तर ही मोठी समस्या आहे. त्यासाठी सोशल मिडिया वापरासाठी टाईमर सेट करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही जर डिजीटल मिडियामध्ये हरवून गेल्यासा तुम्हाला त्यातून बाहेर येण्यासाठी रिमांईडर देत राहील.

3.तुम्हाला सोशल मिडिया वापरल्यानंतर दुखी किंवा वाईट वाटते का?

तुम्हाला सोशल मिडिया वापरल्यानंतर दुखी होता का? ज्या सोशल मिडिया फ्लॅटफॉर्मचा तुमच्या वर परिणाम होतो त्यांटा वापर बंद करा. तुम्हाला नक्की कशाचा त्रास होत आहे हे जाणून न घेताच सोशल मिडिया फ्लॅटफॉर्म वापर बंद केला तर नंतर जेव्हा तुम्ही पुन्हा त्याचा वापर करता तेव्हा पुन्हा तुमच्यावर त्याचा परिणाम होईल. कोणते लोक किंवा फ्लॅटफॉर्म तुमच्यावर परिणाम करतायेत हे शोधां त्यानंतर त्यांचा वापर बंद करा.

4. तुम्ही डिजीटलचा अतिवापर करत आहात की आहारी (अॅडिक्शन) गेला आहात?

सोशल मिडियाचा किंवा डिजिटलचा अतिवापर होत असल्यास त्यासाठी 'अॅडिक्शन' हा शब्द सर्रास वापरला जातो. पण लक्षात ठेवा हे परंतु हे लक्षात ठेवा की अॅडिक्शन हे विशिष्ट मानसिकस्थितीचे अतिशय विशिष्ट निकषांसह आरोग्य निदान केल्यावरच म्हंटले जाते. जेव्हा तुम्ही आयुष्यात( नाते, नोकरी, शाळा-कॉलेज) अडथळा येतो, निवांत वेळ घालवणे बंद करता, तुमच्या आवडी सोडून देता तेव्हा ही खरी समस्या तेव्हा ठरते.

Web Title: Do You Need A Digital Detox Ask Yourself 4

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :mobileDIGITAL DETOX