ड्राय आय सिंड्रोमने त्रस्त असल्यास करा 'हे' घरगुती उपाय

डोळ्यांच्या समस्येकडे करु नका दुर्लक्ष!
eyes
eyes
Updated on

सध्याच्या काळात लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण मोबाईल, लॅपटॉप, टिव्ही यांचा वापर करताना दिसतो. परंतु, सतत मोबाईल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर राहिल्यामुळे त्याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांच्या आरोग्यावर होत असतो. सध्या अनेक जण डोळ्यांची जळजळ होणे, डोळे दुखणे, डोळे लाल होणे यासारख्या समस्येने त्रस्त आहेत. इतकंच नाही तर अनेकांमध्ये ड्राय आय सिंड्रोमची समस्यादेखील निर्माण झाली आहे. ड्राय आय सिंड्रोममध्ये डोळ्यातील अश्रुंची निर्मिती कमी होते. तसंच डोळ्यांना व्यवस्थितरित्या लुब्रिकेशनदेखील मिळत नाही. त्यामुळे ड्राय आय सिंड्रोमच्या समस्येवर घरगुती उपाय कोणते ते पाहुयात. (do you suffer from dry eyes)

१.गरम वाफेचा शेक -

ड्राय आय सिंड्रोममध्ये डोळे दुखणे, डोळ्यांची आग होणे यासारख्या समस्या जाणवत असतात. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये डोळ्यांना गरम पाण्यात भिजवलेल्या रुमालाने किंवा गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्यावा. यासाठी एक स्वच्छ सुती कापड घेऊन ते कोमट पाण्यात भिजवावं आणि घट्ट पिळून हे कापड डोळ्यांवर ठेवावं. त्यानंतर याच कापडाने पापण्या व डोळ्यांखालील भाग हलक्या हाताने पुसून घ्यावा. साधारणपणे १५-२० मिनीटे हा प्रयोग करत रहावा. यामुळे डोळ्यांना लुब्रिकेशन मिळण्यास मदत होते. तसंच डोळ्यांच्या अश्रुंची गुणवत्तादेखील सुधारते. सोबतच डोळे लाल होणे, डोळ्यांची आग होणे या समस्या दूर होतात.

२. खोबऱ्याचं तेल -

खोबऱ्याचं तेल डोळ्यांसाठी एक प्रकारे रिवेटिंग एजंट प्रमाणे काम करतो. यामुळे डोळ्यातील अश्रू लवकर सुकण्याचं प्रमाण कमी होतं. खोबऱ्याच्या तेलात अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात,ज्यामुळे डोळ्यांच्या समस्या दूर होतात. यासाठी कापसाचा बोळा नारळाच्या तेलात भिजवा आणि १५ मिनिटांसाठी डोळ्यांवर ठेवा.

३. नुट्रिशनल सप्लिमेंट्स -

ओमेगा ३ फॅटी अॅसिडचा समावेश असलेल्या पदार्थाचं सेवन केल्यामुळे ड्राय आइजची समस्या दूर होते. त्यामुळे आहारात सॅल्मन फिश,सार्डिन मासा, जवसाचं तेल,अक्रोड या पदार्थांचा समावेश करावा. ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे डोळ्यात अश्रू निर्मिती होते आणि डोळ्यांवरील सूजही कमी होते.

४. कोरफड -

कोरफडीचा वापर केल्यामुळे डोळ्यांना नैसर्गिकरित्या मॉइश्चराइज केलं जातं. यात अँटी इंफ्लेमेटरी गुण असल्यामुळे डोळ्यावरील सूज, डोळे लाल होणे या समस्या दूर होतात. यासाठी कोरफडीचा ताजा गर घेऊन तो टिश्शू पेपरवर ठेवावा आणि त्यानंतर डोळे बंद करुन हा टिश्शू पेपर डोळ्यांवर ठेवावा. १० मिनिटांनंतर डोळे कोमट पाण्याने धुवून घ्यावेत.

५. गुलाबपाणी -

डोळ्यांवर गुलाब पाण्याच्या पट्ट्या ठेवल्यामुळे डोळ्यांवरील ताण, थकवा दूर होतो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com