लांब, दाट केस पाहिजे? सध्या बाजारात 'या' ट्रिक ची क्रेझ | Healthy Lifestyle | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

strong and long hair

Hair Tips: लांब, दाट केस पाहिजे? सध्या बाजारात 'या' ट्रिकची क्रेझ

Hair Tips: लांब, दाट केस पाहिजे? सध्या बाजारात 'या' ट्रिकची क्रेझ महिलांना केसांच्या वेगवेगळ्या स्टाइलची भूरळ असते. त्यात लहान केसांची क्रेझ कमी होऊन लांब केसांची क्रेझ आली आहे. पण, कमी वेळेत केस लांब कसे होणार? मात्र, ‘हेअर एक्स्टेशन’मुळे तुमचे केस हवे तितके लांब होतात. त्यामुळे सध्या महिलांमध्ये याची विशेष क्रेझ पाहायला मिळते आहे.

लग्न सोहळे, कॉलेज फेस्ट असो किंवा ऑफिसची पार्टी अशा अनेक प्रसंगांसाठी महिला व मुली सुंदर दिसण्यावर भर देतात. त्यामुळे केवळ पेहरावच नाही, तर मेकअपबरोबर हेअर स्टाइललाही प्राधान्य दिले जाते. मात्र, केस न वाढणे, लांब किंवा दाट नसल्याची समस्या ही अनेक महिलांना असते. अशात ‘हेअर एक्स्टेन्शन’द्वारे त्या आपल्या केसांना दाट, लांब करत त्यावर हवी तशी हेअर स्टाइल साकारतात.

हेही वाचा: Hair Care: केसांच्या अनेक समस्यांवर एकच रामबाण उपाय, हे वापरून बघा

हेअर एक्स्टेन्शन म्हणजे?

केसांना हवे तितके लांब करण्यासाठी ‘हेअर एक्स्टेन्शन’चा पर्याय निवडला जातो. यामध्ये लहान केसांना विग न वापरता अगदी सोप्या पद्धतीने लांब आणि दाट केले जाते. हेअर एक्स्टेन्शनमध्ये केसांना लांब व दाट दाखविण्याकरिता एक्स्टेन्शनची बट ही वास्तविक केसांमध्‍ये लावली जाते. हे हेअर एक्सटेन्शन नैसर्गिक आणि कृत्रिम अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध असतात. तुमचे मूळ केस किमान चार इंच लांब असले, तर त्याला एक्स्टेन्शन लावता येतात.

एक्सटेन्शनचे प्रकार

लाँग टर्म

टेप-इन हेअर

कृत्रिम किंवा क्लिपऑन

पुण्यात हेअर एक्स्टेन्शनची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. विरळ केसांची समस्या असलेल्या महिला टॉपर्स पण मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. हेअर एक्स्टेन्शनसाठी साधारणपणे ६ ते २० हजार असा खर्च असून केसांची लांबी यानुसार ठरविले जाते.

- आदिती अरोरा, कॉस्मॅटोलॉजिस्ट

‘क्लिपऑन’ परवडणारे हेअर एक्स्टेन्शन करण्यासाठी पार्लर किंवा हेअर एक्सपर्टकडे धाव घेण्याऐवजी आता ऑनलाइनचा पर्यायह निवडत आहेत. विविध संकेतस्थळांच्या माध्यमातून वेगवेगळे आकार, रंगांचे कृत्रिम (क्लिपऑन) एक्सटेन्शन खरेदी केले जाते. हे वापरणे सोपे व परवडणारे असल्याने तरुणी याचा वापर करतात.

हेही वाचा: Hair Growth Tips: केसांच्या वाढीसाठी पाच प्रभावी आयुर्वेदिक उपाय

हेअर एक्स्टेन्शनची मागणी का वाढली ?

  • लांब केसांच्या आवडीमुळे याची पसंती वाढली.

  • यामुळे नैसर्गिकरीत्या केस वाढण्याची प्रतीक्षा करावी लागत नाही

  • लांब केसांचा ट्रेंड असल्यामुळे आणि केसांची वाढ होत नसल्यामुळे मागणी वाढली आहे.

  • विरळ केस किंवा टक्कल पडल्यामुळे तसेच सौंदर्य खुलविण्यासाठी हेअर एक्स्टेन्शन केले जाते.

  • लग्न सोहळा किंवा इतर कार्यक्रमांसाठी हेअर एक्स्टेन्शन उत्तम पर्याय म्हणून बघितला जातो.

Web Title: Do You Want Strong And Long Hairs Try This Popular Trick In Market

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..