
Diabetic Precautions: उष्णाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळपाणी फायदेशीर ठरते. यामुळे अनेक पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. तसेच आजारी व्यक्तीला देखील नारळ पाणी दिले जाते. नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि इलेक्ट्रोलाइट्स सारखे पोषक घटक असतात. फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले नारळाचे पाणी डिहायड्रेशनची समस्या असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरते असं तज्ज्ञांचे मत आहे. पण नारळ पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी खरंच वाढते का असा प्रश्न अनेकांना पडतो. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.