Kiss Day : किस करताय? 'शास्त्र असतं ते!'

वैयक्तिक जीवनातल्या आठवणी समोर आल्यानंतर अनेकांना आजही उत्साह संचारतो.
Kiss Day : किस करताय? 'शास्त्र असतं ते!'

व्हॅलेन्टाईन वीक म्हणजे प्रेमाचं प्रतिक! एकमेकांना कायम जीव लावणाऱ्या, 'हमसफर' म्हणवून घेणाऱ्या सर्वांसाठी या आठवड्यात काही ना काही इव्हेंट्स सुरू असतात. अनेकदा 'व्हॅलेन्टाईन वीक'मधील सगळेच दिवस प्रेमी युगुलं सेलिब्रेट करताना दिसतात. आणि याच आठवड्यातील आज 'किस-डे' आहे. (Kiss Day 2022)

तारुण्यात पहिल्यांदा चुंबन घेताना तुमच्या मनात घालमेल झाली असेल. किंवा पहिल्यांदाच ओठांना झालेला स्पर्श तुम्हाला आजही आठवत असेल. वैयक्तिक जीवनातल्या या आठवणी समोर आल्यानंतर अनेकांना आजही उत्साह संचारतो. पण चुंबन ही नैसर्गिक प्रक्रिया असून जोडीदारावरील प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग आहे. किसींगच्या प्रकारावर अवलंबून असणाऱ्या विविध भावना तुम्हाला जाणवू शकतात. चुंबन हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचं तज्ज्ञ सांगतात. किसींग आपल्याला कॅलरी बर्न करायलाही मदत करतं.

चुंबनाचे वेगवेगळे प्रकार तुम्ही ऐकले-वाचले असतील. पण किस केल्याने शरीरातील किती कॅलरी बर्न होतात, हे तुम्हाला माहिती आहे का? चुंबनाच्या प्रकारानुसार कॅलरी बर्न होण्याचं प्रमाण बदलतं का? पॅशनेट किसींगचे फायदे काय आहेत? सायन्स नक्की काय सांगतं? याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेखात मिळतील.

अमेरिकन कार्डिओलॉजिस्ट जोसेफ एस यांनी फिलेमॅटोलॉजीवर 2013 साली अहवाल सादर केला. त्यामध्ये ओठांच्या नेहमी घडणाऱ्या हालचालींपेक्षा थोडं जास्त असणाऱ्या एका 'कॅज्युअल किस'चं वर्णन आहे. या किसमुळे प्रति मिनिट 2 ते 3 कॅलरीज बर्न होतात. अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये एमडी, अल्पार्ट यांनीही याबद्दल तुलनात्मक माहिती मांडली आहे. पलंगावर स्थिर बसून प्रति मिनिट सुमारे 1.3 कॅलरीज बर्न होतात. मात्र, किसींगमुळे मिनीटाला जवळपास ३ कॅलरी बर्न होतात. अल्पार्ट यांच्या मते खूप तीव्र आणि उत्कटतेने केलेलं किस प्रति मिनिट 26 कॅलरीज सुद्धा बर्न करू शकतं.

priyanka chopra and nick jonas
priyanka chopra and nick jonas

किसिंगच्या प्रकारानुसार कॅलरीज बर्न होण्याचं प्रमाण बदलतं?

किस किती कॅलरी बर्न करेल, हे विविध घटकांवर अवलंबून असतं. चुंबन दीर्घ असेल, तुम्ही किसींगदरम्यान बसलेले किंवा उभे असाल, तुमचे हात वापरून ही प्रक्रिया होत असेल तर कॅलरी बर्न होण्याचं प्रमाण बदलतं. यामध्ये चुंबनाचा प्रकार, तुमचं वय, वजन या घटकांचाही समावेश होतो. किसींगमध्ये बर्न होणाऱ्या कॅलरीजचं प्रमाण बऱ्याच घटकांवर अवलंबून असतं. त्यामुळे या प्रक्रियेत बर्न केलेल्या निश्चित कॅलरीजचं प्रमाण सांगणं जवळजवळ अशक्य आहे. पण तज्ज्ञांनी यावर संशोधन करत किसींगच्या वेगवेगळ्या प्रकारांमधून किती कॅलरी बर्न होतात, याचे अंदाज बांधले आहेत.

तुम्ही 'पॅशनेट किसर' आहात का?

किस करण्याआधी उत्कंठा वाढणं आणि चुंबनाला सुरुवात झाल्यानंतर हळूहळू उत्कटतेने दोन व्यक्ती जवळ येणं हे स्वाभाविक असतं. मात्र तुम्ही उत्कटतेने किस करत असाल, तर दर मिनीटाला तुमच्या 5 कॅलरी बर्न होऊ शकतात. हे प्रमाण कॅज्युअल किसींगच्या थेट दुप्पट आहे. तुमच्या हृदयाचे वाढणारे ठोके आणि सळसळणारा रक्तप्रवाह शरीराला आणखी कॅलरीज बर्न करण्यासाठी उद्युक्त करतो. चुंबनासोबत तुम्ही आणखी काय करता, त्यामुळे मोठा फरक पडतो. जर तुम्हच्या शरीराचं तापमान वाढत असेल, याचसोबतच किसींगमध्ये हात वापरत असाल आणि तुमचं शरीराची हालचाल वाढली असेल, तर कॅलरी बर्निंग वाढतं. इतर व्यायामाप्रमाणे, उभं राहणं आणि एकावेळी अनेक स्नायूंचा वापर करणं आपसुकच कॅलरी बर्न वाढवतो.

after lockdown kissing competition in chinese industr
after lockdown kissing competition in chinese industr

किसींगसोबत 'मेकआउट' करत असाल, तर हे जाणून घ्या!

अनेकांना कॅज्युअल आणि पॅशनेट किसींगच्या पलिकडे जाणारा रोमान्स आवडतो. त्यामुळे आपसुकच त्यांच्यातील फोरप्लेचा वेळ वाढतो. तुम्ही चित्रपटात दाखवल्यासारखे मेकआऊट करत असाल, तर रोमांच द्विगुणीत होऊ शकतो. नाटकीयपणे एकमेकांना उचलणे, भिंतींना एकमेकांवर दाबणे, हॉटरुममध्ये किस करणे, बॉलरूम डान्स, एकमेकांसोबत प्रेमाने झटापट करणं, या गोष्टी रोमान्सचा आनंद वाढवतात. यामध्ये शारीरिक हालचाली आणि स्नायूंचा सहभाग वाढल्याने कॅलरी बर्निंगची प्रक्रिया वेग पकडते. पॅशनेट किसींगमध्ये दर मिनिटाला कमीतकमी 6-7 कॅलरीज बर्न होतात.

Kissing Science | शास्त्र असतं ते!

किसींग हा दैनंदीन व्यायामाशी पूर्णपणे समांतर चालणारा विषय नाही. कारण फक्त किस केल्याने कोणाचे वजन घटल्याचे शास्त्रीय पुरावे नाहीत. मात्र, शरीर व्यायाम करताना कॅलरी जाळतं, त्याचप्रकारे किसींगमध्येही कॅलरीज् बर्न होतात. स्नायूंच्या हालचालीद्वारे त्यामध्ये भर पडते. एका संशोधनानुसार 'भावूक' चुंबनामध्ये चेहऱ्याच्या 34 स्नायूंचा समावेश असू शकतो. मुख्यतः ऑर्बिक्युलरिस ओरीस हा स्नायूंचा समूह यामध्ये महत्वाची भूमिका बजावतो.

तुम्ही चुंबनाच्या वेळी ओठ पुढे करता, त्यावेळी शरीरातील तब्बल 112 पोस्चरल स्नायू कार्यरत असू शकतात. अर्थात यावेळी तुमची पोझिशन कोणती, हे महत्वाचं असतं. म्हणजेच तुम्ही उभे आहात, किंवा बसलेले आहेत, इ. गोष्टी यामध्ये भूमिका वठवतात. चुंबनाची तीव्रता, शारीरिक हालचाल, आणि जितका रोमँस जास्त, तितक्या कॅलरी जास्त बर्न होतात.

singer Aditya Narayan and Shweta Agarwal celebrate kiss day with smooch life is short find someone to love
singer Aditya Narayan and Shweta Agarwal celebrate kiss day with smooch life is short find someone to love

पर्सनल ट्रेनर आणि पोषणतज्ज्ञ जेमी हिकी सांगतात की, तुमचे शरीर चयापचय प्रक्रियेद्वारे कॅलरी बर्न करते. ज्यामध्ये अन्न आणि पेय ऑक्सिजनसह कॅलरी एकत्र करून ऊर्जा स्त्रोतांमध्ये रुपांतरित केली जाते. तिथून, ती तुमच्या शरीरात ऊर्जा सोडण्यासाठी वापरली जाते. हृदयाला धडधडण्याची परवानगी देण्यासाठी, फुप्फुसांना संकुचित करण्यासाठी, विघटन करण्यासाठी आणि जगण्यासाठी आवश्यक असलेले इतर सर्व कार्य करण्यासाठी, कॅलरी बर्न होत असतात. परंतु चुंबनाच्या बाबतीत आपले शरीर ऑक्सिजनच्या वापराद्वारे कॅलरी बर्न करते.

ऑक्सिजनचा वापर कॅलरी बर्न करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. किस करताना तुम्ही दीर्घ श्वास घेत असाल, तर हृदयाचं वेगाने धडधडणं स्वाभाविक असतं. यावेळी स्नायू आणि मेंदूला ताज्या ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा होतो. यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या उर्जेची पूर्तता करण्यासाठी शरीर कॅलरी बर्न करतं. त्यामुळे किसींग आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com