

Best non-toxic colors for Holi festival: होळी हा सण रंगांचा आणि आनंदाचा सण आहे. पण मुलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. रंगांमध्ये असलेली रसायने, पाण्यामुळे घसरण्याचा धोका किंवा चुकून रंग डोळ्यांत गेल्याने मुलांसाठी समस्या निर्माण होऊ शकतात.
अशावेळी पालकांनी त्यांना होळीचे रंग खेळण्याचे योग्य आणि सुरक्षित मार्ग शिकवले पाहिजे. हर्बल रंगांचा वापर, डोळे आणि त्वचेचे रक्षण करणे, योग्य कपडे निवडणे आणि रंगांशी काळजीपूर्वक खेळणे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी मुलांना निरोगी ठेऊ शकतात. होळीचे रंग खेळण्यापूर्वी मुलांना कोणत्या गोष्टी सांगाव्या हे सोप्या शब्दात समजून घेऊया.