हॅप्पी पेरेंटिंग : यश साजरं करताना...

अपयशाशी लढण्याविषयी आपण मागील लेखात वाचलं; पण त्याहूनही अवघड असतं ‘यश’ साजरं करणं!
Celebrating success
Celebrating successsakal

अपयशाशी लढण्याविषयी आपण मागील लेखात वाचलं; पण त्याहूनही अवघड असतं ‘यश’ साजरं करणं! आपल्या मुलांनी यश मिळवलं- मग ते अभ्यासात असो किंवा खेळामध्ये असो - प्रत्येक आई-वडिलांना, कुटुंबाला आनंद होणं स्वाभाविकच आहे; पण हे यश साजरं करताना आपण कळत-नकळत काही चुका करतो.

  • आपल्या मुलाचं यश साजरं करताना आपण त्याचं कौतुक करताना त्याच्या अहंकाराला फुलवत असतो. अहंकार पुढच्या दुर्वर्तनाची सुरुवात असते.

  • आपलं मूल जिंकतं, तेव्हा दुसरं कुणीतरी मूल - विशेषतः आपल्याच मुलाचा मित्र- हरलेला असतो. अशा वेळेस आपला आनंद साजरा करताना भान राहिलं नाही तर आपल्या मुलांचा एक चांगला मित्र दूर जाऊ शकतो.

  • काही वेळा आपण आणि आपली मुलं एखाद्या यशानं हुरळून जाऊन आकाशात उडायला लागतो, फुशारक्या मारायला लागतो. त्या यशासाठी कुणी मदत केली असेल, तर त्याला विसरून जातो. आपणच आपल्या मुलाचा पुढचा मार्ग काटेरी करायला जातो.

  • अपयश आलं तर आपण झगडून यशासाठी प्रयत्न करतो; पण यश मिळाल्यावर ‘पुढे काय करायचं?’ हे न कळल्यानं गडबड होते.

  • आपल्या मुलाच्या यशामुळे सगळ्यांनाच आनंद होत नाही. काहींना मत्सरही वाटू शकतो. त्यामुळे यशाचा ‘ढोल वाजवताना’ अशा शत्रूचा विचार नक्की करावा लागतो. या आणि अशा अनेक कारणांमुळे यश साजरं करताना जास्त काळजी घ्यावी लागते.

  • यश मिळण्यासाठीच्या खडतर प्रयत्नांचं कौतुक करूयात- व्यक्तीचं नको! त्यानं पुढच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळतं. अहंकार नियंत्रणात राहतो.

  • आपल्या मुलाच्या जिंकण्याच्या आनंदात, हरणाऱ्या मुलाचंसुद्धा कौतुक सहन करावं. टेनिसमध्ये मॅच संपल्यावर खेळाडू हस्तांदोलन करतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे.

  • आपल्या मुलाच्या यशासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला त्या यशाच्या आनंदात सहभागी करून घ्या.

  • यश साजरं करताना ज्यांना खरोखरच तुमच्या मुलाबद्दल प्रेम, आत्मीयता आहे त्यांनाच त्यात सहभागी करा. विशेषत: सोशल मीडियावर पोस्ट लिहिताना नक्की विचार करा! शक्यता आहे की आपण अनेकांना दुखावत असू किंवा आपल्याला बढाईखोर म्हटलं जाऊ शकतं.

  • अपयश म्हणजे कायमचा शेवट नाही, तसंच यशही कायमस्वरूपी नाही. या यशाचा पायरी म्हणून वापर करून पुढच्या यशासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं.

  • अपयश हृदयात साठवू नये आणि यश डोक्यात जाऊ देऊ नये!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com